आज सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०१६ सकाळी 7 ते 10 रेडीओ सिटी ९१.१ जरूर ऐका… कारण विद्या बालन ने तुम्हाला दिलेली गुड मॉर्निंग मुंबई ची हाक ‘मुन्नाभाई ‘ मधील स्मरणात असेल .. आता अशी हाक पुण्याच्या महापौर प्रशांत जगताप यांनी दिली कि नाही ते हा कार्यक्रम ऐकताना च कळेल. पण सध्या तरी महापौर जगताप यांनी आरजे ची भूमिका या रेडीओवर वठवली असल्याचे स्पष्ट झाले आहे .
महापौरांनी या संदर्भात स्वतः काय म्हटले आहे ते पुढे वाचा ….
जेव्हा मला Radio Jocky होण्याची संधी मिळते…
रेडिओ सिटी ९१.१ या रेडिओ वाहिनीच्या एका खास कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रसिद्ध आर.जे. केदार जोशी यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या या कार्यक्रमात मी आर.जे. म्हणून भूमिका निभावली आहे. दररोजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत एक वेगळा आणि चिरतरुण अनुभव पदरात पडला, याचं एक वेगळं समाधान मनाशी आहे.
माझी आवडती गाणी या कार्यक्रमदरम्यान प्रसारित करण्याचा प्रयत्न आहे. उद्या (सोमवारी) सकाळी सात ते दहा या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.
