पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवार) सायंकाळी साडेसात वाजता पुणे मेट्रो प्रकल्पाचे भुमीपूजन करण्यात आले. पुणे येथिल कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रिय मंत्री शरद पवारही उपस्थित होते .व्यंकय्या नायडू ,नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीलम गोऱ्हे, अमर साबळे,संजय काकडे , अनिल शिरोळे ,प्रकाश जावडेकर ,शिवाजीराव आढळराव, दिलीप कांबळे,श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, महापौर प्रशांत जगताप, शकुंतला धुराडे आदी मान्यवर उपस्थित होते .
काँग्रेस मुळे च सवाशे कोटी लोक रांगेत आहेत , त्यांनी जर स्वच्छ कारभार केला असता तर माझ्यावर हि वेळ आली नसती असे सांगत काळ्या पैशावाल्यांना अजूनही वेळ आहे गरीबांचा पैसा परत करा असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला . १५ वर्षापासून महाराष्ट्राची गाडी खड्ड्यात फसलेली होती . महाराष्ट्राचे आणि दिल्लीचे इंजिन जोडल्याने डबल इंजिन झाले आणि मेट्रो पुण्यात आली वेगाने काम होईल हि डबल इंजिनची ताकद आहे , असे त्यांनी नमूद केले
महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते यावेळी पंतप्रधानांचा’पुणेरी पगडी’ व महात्मा फुलेंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला .आम्हा सर्वांचे मार्गदर्शक शरद पवार आणि माझे अगदी जवळचे मित्र महापौर प्रशांत जगताप असा उल्लेख यावेळी बोलताना पालक मंत्री गिरीश बापट यांनी केला .खुद्द पंतप्रधानांनी यावेळी महापौरांचे नाव भाषणात घेतले. ते म्हणाले , जगतापांना किती आनंद झाला हे मला माहिती नाही ,कारण राजकीय कारणांनी कधी आनंद झाला तरी जाहीर करणे मुश्कील होते असे ते म्हणाले ..आता व्यंकय्या नायडू यांनी सांगितले कि २८ कोटी ऐवजी आता पुण्याला १६० कोटी मिळणार आहेत , आता महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. १६० कोटी महापालिकेला मिळाल्यानंतर ‘क्या कुछ नाही कर सकते हो ‘ असे मोदी यांनी सांगून हे सारे मी नोटाबंदी केल्याने झाले असे हि स्पष्ट केले .ते पुढे म्हणाले, हे केवळ पुण्यात नाही देशभरात २०० ते ३०० टक्के उत्पन्न पालिकांचे वाढले कारण मोदी घेवून जाईल त्यापेक्षा इथे द्या … अशा विचारातून हे झाले असे ते म्हणाले .
ज्या सुविधा शहरात असायला हव्यात त्याच गावात देखील असणे जरुरीचे आहे , गावे हळू हळू शहरे बनली तर शहरांकडे येणारे लोंढे थांबतील तरच आम्ही शहरांपुढील आव्हानाचा सामना करू शकू केवळ राजकीय लाभाचा विचार करून चालणार नाही तर २५ ते ३० वर्षानंतर शहरे कशी हवीत आणि गावे १८ व्या शतकातील जिने जगणार नाहीत अशा पद्धतीने नियोजन सुरु केले आहे असे ते म्हणाले . ते पुढे म्हणाले , १९८८ सालीच बेनामी संपत्तीचा कायदा संसदेत मंजूर झाला , पण केवळ तो जयजयकारा पुरताच मर्यादित राहिला आणि फाईलीत लुप्त झाला, टो मी आल्यानंतर च बाहेर आला आहे .तो कायदा लागू करण्यात आला नाही , जर लागू करून अंमल करण्यात आला असता तर बेनामी संपत्तीचे पाप वाढले नसते .जर वेळीच देशात अशा आजारावर उपचार केले असते तर मला कठोर निर्णय घेण्याची गरज नव्हती .आणि सव्वाशे करोड लोकांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती .
८ नोव्हेंबर नंतर छोट्या लोकांची ताकद वाढली , जशी हजारची कमी झाली आणि १०० ची किमत वाढली. बॅंकेत नोटा गेल्या म्हणजे त्या सफेद झाल्या असे समजू नका , अजूनही वेळ आहे , गरिबांचे पैसे परत करा .. योग्य रस्त्यावर या काही चिंता राहणार नाही , जर नाही आले योग्य रस्त्यावर तर मी आहे पुढे .. असे आव्हानही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना खासदार संजय काकडे यांचे नाव घेतले नाही , स्मार्ट सिटी चा प्रकल्प पुण्यापासून सुरु व्हावा हि नरेंद्र मोदींचीच इछ्या होती असे यावेळी त्यांनी सांगितले . पुण्याचे नाव जगाला माहिती आहे , पण विमानतळ ही पुण्याची कमतरता होती , त्यामुळे आता संभाजीराजेंच्या नावाने एक विमानतळ निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे असे सांगून ते म्हणाले . काही लोकांनी कालच मेट्रोचे भूमिपूजन केले , त्यांनी जेव्हा मेट्रोला मान्यता द्यायला हवी होती तेव्हा दिली नाही २५६ त्रुटी काढल्या . आता अधिकृत भूमिपूजनाची परवानगी त्यांना जनतेने दिलेली नाही . त्यामुळे त्यांनी अस्रच स्वतःला अधिकृत समजून भूमिपुजने करीत राहावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला .पुण्याबरोबर पिंपरी चिंचवड चा हि स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात येत असल्याबद्दल यावेळी त्यांनी व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले .








