दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मेट्रो क्रिकेट क्लब संघाची शानदार सुरुवात

Date:

  • डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, अँबिशियस क्रिकेट अकादमी संघांची विजयी सलामी

पुणे, 14 ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गुरवीर सिंग सैनी(6-30) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मेट्रो क्रिकेट क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा 145 धावांनी धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. तर डेक्कन जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि अँबिशियस क्रिकेट अकादमी या संघांनी विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघाला 47.4षटकात सर्वबाद 224 धावा करता आल्या. यात निशांत नगरकरने 74चेंडूत 3चौकार व 1षटकारासह 74 धावांची संयमी खेळी केली. निशांतला प्रशाम गांधीने 38 धावा काढून साथ दिली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 102 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. पीवायसीकडून नचिकेत वेर्लेकर(4-48), साहिल छुरी(3-30), यश खळदकर(2-36) यांनी सुरेख गोलंदाजी करत मेट्रो क्रिकेट क्लबला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले. याच्या उत्तरात मेट्रो क्रिकेट क्लबच्या गुरवीर सिंग सैनी(6-30), मिरझा अकिब(3-30), निशांत नगरकर(1-1)यांच्या भेदक माऱ्यापुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 21.2षटकात सर्वबाद 79 धावावर आटोपला. यात अमेय भावे  21, साहिल छुरी 18, तेजस तोलसणकर 11 यांनी थोडासा प्रतिकार केला. सामनावीर गुरवीर सिंग सैनी ठरला.

डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत धीरज फटांगरे(65धावा)याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 4 गडी राखून पराभव केला. अन्य लढतीत सचिन भोसले(4-31)याने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा 3 गडी राखून तर, ओंकार राजपूत(3-20)याच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने युनायटेडस्पोर्ट्स क्लब संघाचा 3 गडी राखून पराभव केला.
स्पर्धेचे उदघाटन एमसीएचे खजिनदार शुभेंद्र भांडारकर, दोशी इंजिनियर्सचे संचालक अमित दोशी, वाईड विंग्जचे राजेंद्र मनोहर आणि चॅम्पियन स्पोर्ट्सचे अमित मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव जाधव, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, पाथ-वे फाउंडेशनचे सचिव सिद्धार्थ निवसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:पीवायसी मैदान: 
मेट्रो क्रिकेट क्लब: 47.4षटकात सर्वबाद 224 धावा(निशांत नगरकर 74(74,3×4,4×6), प्रशाम गांधी 38(66,3×4,1×6), सचिन लावेरा 41(62,7×4), गुरवीर सिंग सैनी नाबाद 13, नचिकेत वेर्लेकर 4-48, साहिल छुरी 3-30, यश खळदकर 2-36) वि.वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 21.2षटकात सर्वबाद 79 धावा(अमेय भावे  21, साहिल छुरी 18, तेजस तोलसणकर 11, गुरवीर सिंग सैनी 6-30, मिरझा अकिब 3-30, निशांत नगरकर 1-1); सामनावीर-गुरवीर सिंग सैनी; मेट्रो क्रिकेट क्लब 145 धावांनी विजयी;

डेक्कन जिमखाना मैदान: क्लब ऑफ महाराष्ट्र: 35.4षटकात सर्वबाद 130धावा(संकेत चव्हाण 29(46,3×4,1×6), शुभम मेड 26(46), सागर आनंदपुरे 25(51), ओंकार साळुंके 3-43, आत्मन पोरे 2-22, प्रकाश चौधरी  2-15, धीरज फटांगरे 1-18,  हितेन बनसोडे 1-15) पराभूत वि. डेक्कन जिमखाना: 26.5षटकात 6बाद 131धावा(धीरज फटांगरे 65(35,11×4,2×6), हर्ष सांघवी 23(22), शुभंकर हार्डीकर 16, शुभम मेड 3-47, संकेत चव्हाण 3-28); सामनावीर-धीरज फटांगरे; डेक्कन जिमखाना 4 गडी राखून विजयी;

पुना क्लब मैदान:
पुना क्लब: 38षटकात सर्वबाद 132धावा(आर्यमान पिल्ले 39(72, 6×4), ओंकार आखाडे 23(58),वरद कुलकर्णी 21(35), विश्वराज शिंदे 19, सचिन भोसले 4-31, रिषभ कारवा 4-27, वैभव विभूते 1-39) पराभूत वि. अंबिशियस क्रिकेट अकादमी: 23.3षटकात 7बाद 134धावा(ऋषिकेश बारणे 43(45,7×4), धनराज शिंदे 29, तनिष जैन 19, विश्वराज शिंदे 3-41, सागर बिरदवाडे 2-2); सामनावीर-सचिन भोसले; अंबिशियस क्रिकेट अकादमी 3 गडी राखून विजयी.

डिव्हीसीए मैदान: 
युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 38.2षटकात सर्वबाद 137धावा(संदीप शिंदे 72(92, 8×4,2×6), अथर्व गायकवाड 16, कुणाल कोठावडे 15, निखील कारळे 13, ओंकार राजपूत 3-20, अॅलन रॉड्रिक्स 2-26, राहुल वारे 2-31, कपिल गायकवाड 1-31) पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 29.3 षटकात 7बाद 141धावा(यश जगदाळे30(60,3×4), आदित्य एकशिंगे 24, मिझान सय्यद 23, मनोज यादव 18, आनंद ठेंगे 4-37, अमन मुल्ला 2-40);सामनावीर-ओंकार राजपूत; व्हेरॉक संघ 3 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...