‘मर्सिडीज-बेंझ’च्या ‘एएमजी’चे स्थानिक उत्पादन भारतात सुरू

Date:

 पुण्यातील मर्सिडीज-बेंझच्या भारतीय उत्पादन प्रकल्पात एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपेमुळे स्थानिक उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार.

·         ब्रँडच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये मर्सिडीज-बेंझ इंडियाचा पुण्यातील कारखाना अग्रगण्य.

·         मर्सिडीज-बेंझकडून आता भारतात स्थानिक पातळीवर 11 मॉडेल्सचे उत्पादन.

·         लक्झरी कार्सच्या क्षेत्रात 8 एसयूव्ही आणि एसयूव्ही कूपे सादर केल्याने मर्सिडीज-बेंझकडे सर्वात व्यापक एसयूव्ही पोर्टफोलिओ तयार.

·         विस्तृत जीएलसी श्रेणी : जीएलसी आता 200’, ‘220 डी’, ‘जीएलसी 300 कूपे300 डी कूपे आणि एएमजी 43 कूपे प्रकारांमध्ये उपलब्ध.

·         नवीन जीएलसी 43 फोरमॅटिक कूपेसाठी स्टार इझ सर्व्हिस पॅकेज, 2 वर्षे कालावधी / अमर्यादित किलोमीटरसाठी रु. 85,000.

·         नवीन मर्सिडीज-एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपेची किंमत रु. 76.70 लाख (सर्व किंमती एक्स-शोरूमभारतभर)

पुणे, 3 नोव्हेंबर, 2020 : भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी असलेल्या ‘मर्सिडीज-बेंझ’ने भारतात प्रथमच आपल्या एएमजी श्रेणीतील वाहनाची, ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’ या मॉडेलची स्थानिक पातळीवर निर्मिती केली असून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मर्सिडीज-बेंझ इंडिया आता आपली नवीन जनरेशन कार (एनजीसी), सेडान, एसयूव्ही आणि एएमजी परफॉर्मन्स कार यांचे उत्पादन भारतातील एकाच कारखान्यात तयार करणार आहे.

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या पुण्यातील कारखान्याची क्षमता वर्षाकाठी 20 हजार गाड्यांची निर्मिती करण्याइतकी आहे. भारतातली लक्झरी मोटारींच्या उत्पादकांमध्ये ही क्षमता सर्वात मोठी ठरते.

भारतात बनवलेली ही पहिलीच एएमजी श्रेणीतील गाडी, ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’, कारखान्यातून बाहेर चालवत आणण्याचा मान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क आणि ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक पीयूष अरोरा यांना मिळाला. 

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेन्क यावेळी म्हणाले, “लक्झरी कार्सच्या भारतातील सर्वात मोठ्या कारखान्यात ‘एएमजी श्रेणी’ची गाडी स्थानिक स्तरावर उत्पादीत करणे ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. भारतीय बाजारपेठेबद्दलची आमची कटिबद्धता आणि ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा हा आविष्कार आहे. ‘एएमजी’च्या स्थानिक उत्पादनामुळे भारतातील या ‘परफॉर्मन्स ब्रँड’ची लोकप्रियता आणखी वाढेल आणि ‘परफॉर्मन्स मोटरींग’ करणाऱ्या उत्साही लोकांची वाढती मागणी पूर्ण होईल. ‘एएमजी’चे स्थानिक उत्पादन करण्यामुळे आम्हाला गतिमान अशा भारतीय लक्झरी कार बाजारामध्ये स्पर्धात्मकदृष्ट्या वरचे स्थान मिळेल.”

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे कार्यकारी संचालक पीयूष अरोरा यांनी नमूद केले, “’मेड इन इंडिया’ ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’चे उत्पादन भारतात सुरू करून, आम्ही भारतीय ग्राहकांना दिलेले, जागतिक दर्जाच्या वाहनांमध्ये महत्त्वपूर्ण स्थानिक मूल्यवर्धन कमीत कमी वेळेत करण्याविषयीचे, वचन पाळत आहोत. ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’ची उत्पादन सुविधा हा आमच्या भारतातील प्रगतीचा कणा आहे. अतिशय उच्च स्तराची सूक्ष्मता, प्रगत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि लवचिक प्रक्रिया या गोष्टींमुळे ‘मर्सिडीज-बेंझ’ची उत्पादन गुणवत्ता सर्वात कठोर अशा जागतिक मापदंडांनुसार असल्याचे सुनिश्चित होते. यातूनच भारतातील लक्झरी कार उद्योगाच्या निर्मितीसाठी नवीन मापदंड तयार होतात. ‘मर्सिडीज-बेन्झ’, ‘मर्सिडीज-मेबॅक’ आणि आता ‘मर्सिडीज-एएमजी’ ही सर्व उत्पादने आमच्या पुण्यातील अत्याधुनिक कारखान्यात तयार होत आहेत, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे.”

उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये :

·         ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’मध्ये कूपेचा अभिजातपणा, स्पोर्ट्स कारची गतिशीलता आणि मर्सिडीज-बेंझ जीएलसीची बहुमुखी प्रतिभा यांचे अनोखे मिश्रण आहे.

·         3.0 लिटरचे ‘व्ही-6 बायटर्बो’ इंजिन आता 390 एचपी (287 किलोवॅट) इतकी शक्ती देते. मागील मॉडेलपेक्षा ही शक्ती  23 एचपीने (17 किलोवॅट) जास्त आहे.

·         ‘जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’मध्ये डायव्हिंगच्या निवडीचे पाच पर्याय मिळतात : “स्लिपरी”, “कम्फर्ट”, “स्पोर्ट”, “स्पोर्ट +” आणि “इन्डिव्हिज्युअल”.

·         ‘रिस्पॉन्सिव्ह एएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी 9-जी ट्रान्समिशन’, ‘रीअर-बायस्ड एएमजी परफॉर्मन्स फोरमॅटिक (31:69) ऑल-व्हील ड्राईव्ह सिस्टम’ आणि ‘एएमजी राइड कंट्रोल + सस्पेंशन’ यांच्यामुळे ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव मिळतो, तसेच कारची चपळताही वाढते.

·         ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’ ही ‘मर्सिडीज मी कनेक्ट’सह सुसज्ज आहे. यातून ग्राहकांना रिमोट लॉक / अनलॉक, कार लोकेटर, स्पीड मॉनिटर, आपत्कालीन ई-कॉल यांसारख्या अनेक सुविधा मिळतात. ग्राहकांच्या स्मार्टफोन / टॅब्लेटवरून त्या वापरता येतात.

·         नवीन पिढीतील टेलीमॅटिक्स, ‘मर्सिडीज-बेंझ यूझर एक्सपीरियन्स (एनटीजी 6.0 सह एमबीयूएक्स)’ | ‘ओव्हर द एअर’ अपडेट करण्यायोग्य, ही या गाडीतील आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

·         एमबीयूएक्स: लक्झरी कार विभागातील ‘एआय’ आणि ‘एमएल’वर आधारित सर्वात बुद्धिमान असा ‘इन-कार व्हर्च्युअल’ सहाय्यक आणि इन्फोटेनमेंट सिस्टम; ‘नेहमी चालू ठेवा’ हा अनुभव संपूर्ण नवीन स्तरावरून यातून मिळतो.

·         ‘बर्मेस्टर सराउंड साउंड सिस्टम’ | ‘डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर’ 12.3 इंच | ‘एएमजी परफॉर्मन्स एक्झॉस्ट सिलेक्टेबल’.

मर्सिडीज-एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपेची तांत्रिक माहिती

इंजिन3.0 लिटर व्ही-6, डायरेक्ट इंजेक्शन आणि बायटर्बो चार्जिंगसह
डिस्प्लेसमेंट2996 सीसी
आऊटपुट390 एचपी (287 किलोवॅट),
5500-6000 आरपीएममध्ये
पीक टॉर्क520 एनएम, 2500-4500 आरपीएममध्ये
ड्राईव्ह सिस्टीमएएमजी परफॉर्मन्स फोर-मॅटिक ऑल-व्हील ड्राईव्ह विथ एएमजी-स्पेसिफिक पॉवर डिस्ट्रिब्यूशन
ट्रान्समिशनएएमजी स्पीडशिफ्ट टीसीटी 9जी
अॅक्सलरेशन 0-100 किमी/तास4.9 सेकंद
टॉप स्पीड250 किमी/तास

पाच ड्राइव्ह प्रोग्राम आणि एएमजी गतिशीलता

‘जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’मध्ये पाच ‘ड्राइव्ह प्रोग्राम्स’ आहेत. गाडी चालवताना ‘’स्लिपरी”, “कम्फर्ट”, “स्पोर्ट”, “स्पोर्ट +” आणि “इन्डिव्हिज्युअल” यांपैकी एकाची निवड करायची असते. त्यांचा वापर केल्याने वाहनामधील वैशिष्ट्ये आणखी वैयक्तिकृत केली जाऊ शकतात. इंजिनचा प्रतिसाद, ट्रान्समिशन, सस्पेंशन, स्टीअरिंग अशा प्रमुख कार्यांचे मापदंड या प्रोग्राम्समधून बदलता येतात. आणि आता ‘एएमजी डायनॅमिक्स अॅजिलिटी कंट्रोल प्रणाली’शीही हे प्रोग्राम जोडलेले आहेत. याचा अर्थ, गाडी हाताळणीची वैशिष्ट्ये विविध आवश्यकतांनुसार व ड्रायव्हिंगच्या परिस्थितीनुसार सेट केली जाऊ शकतात. यामध्ये अधिक डिफरन्शिएशनही आणता येते.

इष्टतम पकड

‘स्टँडर्ड-स्पेसिफिकेशन एएमजी परफॉरमेंस फोरमॅटिक फोर-व्हील ड्राइव्ह’मध्ये मागील बाजूस टॉर्क वितरण देण्यात आले आहे. यात पुढील / मागील अॅक्सेलची विभागणी 31 ते 69 टक्के प्रमाणात आहे. या संरचनेमुळे गाडीची गतिशीलता वाढून, रस्त्यावरील चढावर अधिक प्रवेग मिळतो, तसेच गाडीची गती वाढवताना सुधारित पकड मिळते.

एएमजी राइड कंट्रोल-प्लस सस्पेंशन

‘एएमजी राइड कंट्रोल-प्लस’मध्ये विविध प्रकारच्या ‘सस्पेंशन’चे फायदे एकत्रित करण्यात आले आहेत.  ‘एएमजी-स्पेसिफिक अ‍ॅडॉप्टिव्ह डॅम्पिंग सिस्टम’सह (एडीएस प्लस) ‘एअर बॉडी कंट्रोल एअर सस्पेंशन’वर ती आधारित आहे. त्यातून ‘स्पोर्टी ड्रायव्हिंग डायनॅमिक्स’ आणि लांबवरच्या प्रवासात आराम या गोष्टी मिळतात. हीच या ब्रँडची वैशिष्ट्ये आहेत. ‘अ‍ॅडॉप्टिव्ह डॅम्पिंग अ‍ॅडजस्टमेंट एएमजी राइड कंट्रोल-प्लस’ हे वैशिष्ट्य एक मानक म्हणून समोर येते. ती पूर्णपणे स्वयंचलित अशी इलेक्ट्रॉनिक नियंत्रित प्रणाली आहे. गाडीच्या प्रत्येक चाकावरील डॅम्पिंगला आवश्यकतेनुसार ती अ‍ॅडजस्ट करते.

सुरक्षा

सुरक्षिततेचा विचार केला असता, नवीन ‘जीएलसी 43 कूपे’ त्याबाबतीत अगदी सुसज्ज आहे:

सक्रिय ब्रेकिंग सहाय्य / अ‍ॅक्टिव्ह बॉनेट / मर्सिडीज मी कनेक्ट या अ‍ॅपच्या माध्यमातून 24X7 आपत्कालीन सेवांशी संपर्क / 7 एअरबॅग्जमुळे प्री-सेफ.

एएमजी उत्पादन:

एएमजीची निर्मिती आता स्थानिक स्तरावरही सुरू झाल्यामुळे गेली दोन दशके कार्यान्वित असलेली आमची उत्पादन क्षमता आणखी वाढली आहे. ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’साठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या ‘मर्सिडीज’च्या वाहनांच्या उत्पादनाच्या दृष्टीने ‘एएमजी जीएलसी 43 फोरमॅटिक कूपे’ हे निव्वळ वेगळे मॉडेलच नव्हे, तर उत्पादनाच्या विविध स्तरांवर ते भर पाडणारे आहे. आम्ही आमच्या लवचिक व प्रगत उत्पादन प्रणालीद्वारे हे उत्पादन यशस्वीपणे पार पाडत आहोत.

ही कामगिरी साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत घटकांपैकी एक म्हणजे डिजिटलायझेशन. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आम्ही कारच्या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेपासून ते गुणवत्तेचे निकष कठोरपणे राबविण्यापर्यंत सर्व स्तरांवर अत्याधुनिक, अतिप्रगत यंत्रणा अमलात आणली आहे. कारखान्यात ‘ट्रिम व मेकॅनिकल असेंब्ली’पासून ते वाहन चाचणीचे विविध टप्पे आणि डेटाच्या थेट संश्लेषणापर्यंत ‘डिजिटली कनेक्ट’ केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. यातून ‘इंडस्ट्री 4.0’ आणि ‘एमओ360’ या आमच्या विचारधारेचा अवलंब होत आहे.

वाहन उत्पादनाच्या जटील प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी संपूर्ण पारदर्शकता : ‘मर्सिडीज-बेंझ कार्स ऑपरेशन्स’मध्ये (एमओ) ‘मर्सिडीज-बेंझ कार्स ऑपरेशन 360’ (एमओ 360) ही एक नवीन डिजिटल इकोसिस्टम आहे. उत्पादनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता लागू करण्यासाठी व अत्याधुनिक बिग ‘डेटा अॅनॅलेटिक्स’ वापरण्यासाठी या ‘एमओ 360’चा उपयोग होतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा अखेर राजीनामा

मनपा निवडणूक लढवण्याची घोषणा- अजित पवार गटाशी युतीला...

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...