पुणे- राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश च्या बाबा पाटील यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविला असून , महामंडळाच्या अध्यक्ष भोसले यांनी आपले अध्यक्षपद जास्त काळ भोगता यावे यासाठी निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप केला आहे.
बाबा पाटील म्हणाले कि,’ की अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक हि नियमानुसार वेळेतच घ्यावी अशी आमची मागणी आहे, चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष हे कोरोना चे कारण पुढे करून मुद्दामून इलेक्शन पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, आपणास एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की, महाराष्ट्रात आत्ताच कोरोनाच्या सर्व अटी नियम पाळून ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका झाल्या व तसेच महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुका झालेल्या आपण देखील पाहिल्या आहेतच ,याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने कोरोना संदर्भात ज्या काही अटी नियम दिल्या असतील त्या पाळून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही वेळेत आणि शासनाच्या नियमानुसार होऊ शकतील हे आपणास निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे ,
एवढ्या साऱ्या मोठमोठे निवडणुका जर नियम अटी पाळून होत असतील अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांची निवडणूक का होऊ शकत नाही, का जाणीपूर्वक महामंडळाच्या अध्यक्ष निवडणूक मुद्दामून पुढे ढकलत आहे याची देखील माहिती आपण घ्यावी, महामंडळाची निवडणूक खूपच सोप्या पद्धतीची आहे याठिकाणी फक्त मुंबई पुणे कोल्हापूर एवढेच त्या ठिकाणी निवडणुकीची सेंटर आहेत सभासद संख्या देखील मर्यादित आहे, त्यामुळे ही निवडणूक खूप सुटसुटीत आणि चांगली होऊ शकते, गेले अनेक वर्ष चित्रपट महामंडळाकडून एकही व्यवस्थित वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यात आली नाही कुठल्याही प्रकारच्या संचालक मंडळाच्या मिटिंग त्या ठिकाणी नियमित होत नाही त्याच्यावरही आपण आवर्जून लक्ष घालावे …. तरी कृपया साहेब आपणास विनंती आहे की चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांना आपण संचालक मंडळाची मीटिंग लवकरात लवकर घ्यावी मुदत संपायच्या अगोदर व त्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्व संचालकांनी मिळून, वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करावी, तसेच महामंडळाच्या अध्यक्षांनी संपूर्ण 5 वर्षाचा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवावा आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर कराव्यात अशी आमची मागणी आहे.

