मेघराज भोसले यांना अध्यक्षपदावरून काढले …

Date:

कोल्हापूर-: मनमानी,राजकारणी कारभार आणि गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याविरोधातील अविश्वास ठराव गुरुवारी आठ विरुद्ध चार मतांनी मंजूर करून त्यांच्याकडील अध्यक्षपद काढून घेऊन प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.

महामंडळाचे कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार यांनी सांगितले कि,’आम्ही बहुमताने मेघराज यांना अध्यक्ष केले होते, आता बहुमतानेच त्यांना हटविले असून प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार दिला. लवकरच नवे पदाधिकारी निवडले जातील.

कोरोना काळातील साखर चोरी, दोन लाखांच्या धनादेशाचा भरणा अशा वादग्रस्त विषयांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक येथील शहाजी कॉलेजमध्ये झाली. बैठकीची सुरुवातच नाट्यमयरित्या झाली. बैठक दीड वाजता सुरू होताच संचालक बाळा जाधव यांनी भोसले यांना संचालकांनी आपल्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला असून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हा विषय विषयपत्रिकेवर आलेला नसल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगून राजीनामा देणार नसल्याचे अध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केले. त्यावरून बैठकीत तब्बल पाच तास वादावादी व चर्चेचा घोळ सुरू राहिला.

शेवटी हा ठराव कायदेशीर व्हावा यासाठी ऐनवेळचा विषय म्हणून घेण्यात आला. उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सतीश बिडकर, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, नीकिता मोघे, पितांबर काळे यांनी विरोधात तर खजिनदार संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी अध्यक्षांच्या बाजूने मत दिले. अविश्वास ठरावानंतरही अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने यमकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त नामंजूर करण्यात आले.

सुशांत शेलार म्हणाले, चार वर्षे आम्ही अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पण संचालकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने सुुरू असलेल्या कारभाराला यमकरने वाचा फोडली.यमकर म्हणाले, कोरोना काळात गरीब कलावंतांना किराणा माल मोफत द्यावा म्हणून अनेक नामवंतांनी मदत केली होती त्यात अफरातफर करण्यात आली त्याकडे लक्ष वेधूनही भोसले यांनी त्याकडे दुर्लक्ष केले .साखर चोरी, धनादेश अशा अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. माझे आणि बाळा जाधव यांचे संचालकपद रद्दचा प्रस्ताव अतिशय चुकीचा होती. आम्ही खरे होतो म्हणून संचालकांनी साथ दिली.

मेघराज भोसले म्हणाले, निवडणूक आली म्हणून, गेल्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या माझ्याच पॅनेलच्या ८ जननी अविश्वास ठराव करून माझ्या पाठीत खंजीर खुपसला. सुशांत शेलार यांना अध्यक्ष व्हायचे आहे. संचालकांची कारस्थाने आणि बेकायदेशीर गोष्टी लपविण्याचे तसेच आर्थिक आमिषे दाखवून हे कारस्थान रचले गेले. तुमच्यात दम असता तर नोटीस काढून विषय घ्यायला हवा होता. मी राजीनामा दिलेला नाही आणि खचलेलो नाही. मी न्यायालयात दाद मागेल .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...