मुंबई: २०२० पर्यंत भारतातील कर्करोग रुग्णांनी १.७३ दशलक्ष हा आकडाही पार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्याही ८ लाख ८० हजारांवर पोहोचणार आहे. आजार अधिक बळावल्यावर तो बरा होण्याच्या शक्यता फारच तुरळक असताना ७० टक्के रुग्ण डॉक्टरांकडे जातात.
कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच, या रोगाशी योग्य प्रकारे लढा देण्यासाठी भारतातील जिनोमिक्स आधारित संशोधन व चिकित्सा करणाऱ्या मेडजिनोम या कंपनीने ´ऑन्कोट्रॅक´ हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. लिक्वीड बायोप्सीच्या तंत्रावर विकसित करण्यात आलेल्या ऑन्कोट्रॅक या वेदनारहित चाचणीमुळे भारतातील डॉक्टरांना कर्करोगाच्या विविध प्रकारांवरील जनुकीय उपचार करणे तसेच, त्यांचा अभ्यास करणेही सहजशक्य होणार आहे.
´´एनजीएसवर आधारित असलेल्या लिक्वीड बायोप्सीने कर्करोग व्यवस्थापन शक्य झाले, तर ती भारतातील सर्वांत महत्वाची वैद्यकीय क्रांती ठरेल. जनुकीय चाचण्यांच्या तंत्रज्ञानातून जास्तीत जास्त स्वस्त व तरीही आधुनिक चिकित्सापद्धती शोधून काढण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. ऑन्कोट्रॅक ही चाचणी हा त्याचाच एक भाग आहे,´´ मेडजिनोम चे संचालक सॅम संतोष यांनी सांगितले.
ही चाचणी संपूर्णपणे मेडजिनोम या कंपनीतर्फे विकसित करण्यात आली असून भारतातील अशा प्रकारांतील ही एकमेव चाचणी आहे. संपूर्ण देशांतील अनेक कर्करोग रुग्णांवर या चाचणीचा प्रयोग केला गेला आहे. रुग्णांच्या रक्तातील पेशी विरहित डीएनए निवडून त्याचा नमुना या चाचणीमध्ये पडताळला जातो. उच्च दर्जाचे क्रमवारी तंत्रज्ञान वापरून मेलॅनोमा, फुफ्फुसे व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाशी संबंधित जनुकांचे उत्परिवर्तन (म्युटेशन) शोधून काढले जाते. काही वेळा जनुकांच्या उत्परिवर्तन साखळीमुळे बायोप्सीची प्रक्रिया यशस्वी करणे शक्य नसते किंवा बायोप्सी दरम्यान काही उपकरणे नादुरुस्त होतात, तर कधी टिश्यू बायोप्सी करणेही शक्य नसते. अशा वेळी या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगनिदान करणे सहज शक्य होणार आहे. ज्या रुग्णांमध्ये बायोप्सीची प्रक्रिया हा पर्याय असूच शकत नाही, त्या रुग्णांचे रोगनिदान करून उपचार करण्यासाठी डॉक्टरांना या नवीन तंत्रज्ञानाची मदत होणार आहे.
´´लिक्वीड बायोप्सी या तंत्रज्ञानात अगणित वेळा जनुकांचे उत्परिवर्तन घडवून आणणे शक्य होते. त्यामुळे नवीन औषधांचा शोध लावण्यास तसेच, नवीन सिद्धांत मांडण्यास या तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. आमच्या ऑन्कोट्रॅकचा वापर करून भारतातील जवळजवळ ३५ कर्करोगतज्ज्ञांनी आपल्या रुग्णांची चिकित्सा केली आहे. आमचे उत्पादन रुग्णांच्या सोयीचे असल्याने डॉक्टर व रुग्ण दोहोंकडून या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळेल, याची आम्हाला खात्री वाटते,´´ असे मेडजिनोमचे सीईओ डॉ. व्ही. एल. रामप्रसाद यांनी सांगितले.
हिस्टोपॅथोलॉजी डायग्नोसिस नंतर ऑन्कोट्रॅक हे एक यशस्वी आण्विक तंज्ञत्रान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे फुफ्फुसे व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे निदान व उपचाराची योग्य दिशा ठरवणे सोपे झाले आहे. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे वरीष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. कुमार प्रभास आणि टाटा मेमोरिएल सेंटरच्या एसीटीआरईसी येथील प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर (शास्त्रज्ञ एफ) यांच्या संयुक्त संशोधनातून ही चाचणी पडाळून पाहण्यात आली आहे.
डॉ. कुमार प्रभास यांनी सांगितले की, ´´या तंत्रज्ञानामुळे रुग्णांची वैयक्तिक काळजी घेली जात असल्याने डॉक्टरांनाही अधिक क्षमतेने निदान करणे सोपे झाले आहे. सेल फ्री ट्यूमर डीएनए (सीटी डिएनए) पडताळणीमुळे पुन्हा-पुन्हा बायोप्सी करण्याची गरज भासणार नसून रुग्णांचा उपचारांना मिळत असलेला एकूण प्रतिसाद अभ्यासणेही यामुळे सोपे होणार आहे.´´

