‘रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’च्या वतीने आयोजित ‘कौशल्य विकास’ विषयावर चर्चासत्रास चांगला प्रतिसाद
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘द आर्ट ऑफ लिव्हींग सेंटर फॉर स्कील डेव्हलपमेंट’च्या वतीने ‘कौशल्य विकास’ या विषयावर हे चर्चासत्र महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजिले होते, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांन्स यांनी दिली.
या चर्चासत्राचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य आणि सक्षम वैयक्तिक गुणधर्म यांचे एकत्रितपणे ज्ञान मिळणे हा होता. तसेच विद्यार्थ्यांमधील रोजगार क्षमता वाढविणे आणि रोजगार क्षेत्राकरीता योग्य व्यासपीठ मिळणे या बाबींवर या चर्चासत्रात प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.