पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या दोन विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘आर्कीटेक्चर पदवी’ परीक्षेमध्ये पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. यामध्ये रोहन शहा (द्वितीय क्रमांक, 71.04 %) आणि हुझेफा चलिसाह (चौथा क्रमांक, 69.92 %) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एजुकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य लीना देबनाथ, यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे टॉपर्समध्ये येण्याचा मान त्यांना मिळाला, असे पी.ए.इनामदार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हणाले. यावेळी मुझफ्फर शेख, इरफान शेख, प्रा. आर.टी. गोगले आणि लीना देबनाथ उपस्थित होते.

