पुणे:
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलटिन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एम.ए.रंगूनवाला इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’च्या वतीने ‘माजी विद्यार्थी मेळावा 2017’ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये 120 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रथम वर्ष ते नुकतेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रान्त्झ यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रा. इम्रान सय्यद, प्रा. नितीन शिंदे, प्रा.विन्सेंट केदारी, प्रा.नीरज जोशी, प्रा. प्रियांका शेट्टी, अंकिता भिडे, चंदा सुपेगांवकर उपस्थित होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे आयोजन केले होते.

