पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज’चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. दिगंबर दुर्गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या.
हा कार्यक्रम एम.सी.ई. सोसायटीच्या डॉ.ए.आर.शेख असेंब्ली हॉलमध्ये नुकताच पार पडला.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातंर्गत उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू अलमास शेख, आंतरराष्ट्रीय रोप स्किपिंग खेळाडू मुजम्मल शेख यांचा महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘आधार ग्रामीण विकास संस्था’( कुंडल, जि. सांगली) या संस्थेकडून दरवर्षी ‘राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल’ प्रशालेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांना ‘कलाश्री’ सन्मानाने महापौर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

