मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा…

Date:

  • सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात तुरूंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक व भोजन सुविधा याकामी केली प्रयत्नांची शर्थ

मुंबई  – ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र’, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली असून भारताची प्रतिष्ठाही राखली आहे. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांनी ‘डॉ. दातार हे खरोखरच ‘अल अदील’ (भला माणूस) आहेत’ या शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली.

सौदी अरेबियामध्ये जेद्दाह शहरात कामासाठी गेलेले हे भारतीय कामगार करोना साथ व लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले होते. काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती, काहींच्या नोकऱ्या गमावल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करुन गुजराण करत होते, तर काहीजण निर्धन झाल्यामुळे दुसरा काही पर्याय नसल्याने अक्षरशः भीक मागत होते. या गोष्टी स्थानिक कायद्याला धरुन नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली होती. तुरूंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकुळ झाले होते. याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमांत आले होते.

डॉ. धनंजय दातार यांना हे समजताच त्यांचे मन हेलावले. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका अशा शेजारी देशांनी त्यांच्या कामगारांना लगेचच घरी नेण्याची व्यवस्था केली, पण भारतीय कामगार मात्र चार महिने निष्कारण तुरूंगात अडकून पडल्याचे समजताच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी देशबांधवांच्या मदतीला धावून जाण्याचा निश्चय केला. संयुक्त अरब अमिरात व सौदी अरेबिया हे वेगवेगळे देश असल्याने एका देशातून दुसरीकडे पाठपुरावा करण्याचे काम तितकेसे सोपे नव्हते. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत (कॉन्सुलेट) जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरूंगवासातून सोडल्यास सर्वांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली.

सौदी अरेबिया प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. भारत व सौदी अरेबियादरम्यान सध्या विमान वाहतूक बंद असल्याने सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करत या सर्व कामगारांना आपल्या ‘सौदीया एअरलाइन्स’ या अधिकृत विमानसेवेद्वारे भारतात आणून पोचवले, तर कामगारांची जेद्दाह विमानतळापर्यंत वाहतूक, वैद्यकीय तपासणी व खाण्या-पिण्याची पूर्ण जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. यातील ४५१ कामगार ‘सौदीया एअरलाइन्स’च्या २ विशेष फ्लाईट्समधून दिल्ली विमानतळावर तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. पैकी दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. दातार म्हणाले, “आखाती देशांत अडकलेल्या निर्धन भारतीय कामगारांचा विमान तिकीटाचा, खान-पानाचा व वैद्यकीय चाचणीचा पूर्ण खर्च उचलून त्यांना सुखरुप मायदेशी पाठवण्याची मोहीम आम्ही राबवत आहोत. आमच्या अल अदील समूहाच्या कंपनी सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास ५००० गरजूंना हे साह्य देऊन भारतात रवाना केले आहे. मी व्यवसायाबरोबरच आखाती देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार यातही सक्रिय आहे आणि खरेतर मी विशेष काही केलेले नाही कारण संकटाच्या काळात आपल्या बांधवांची मदत करणे हा माणुसकीचा व भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. सौदी अरेबियात परिस्थितीने हतबल झालेले ७०० भारतीय कामगार तुरूंगात अडकून पडले असून ते असहाय्य आहेत, हे समजताच मी अस्वस्थ झालो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केला. सर्वांच्या सहकार्यामुळे आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोचून आपल्या कुटूंबियांसमवेत समाधानात व सुरक्षित राहतील याचाच मला खूप आनंद आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...