मारूती सुझुकी दक्षिण डेअर रॅली महाराष्ट्रात प्रवेशासाठी सज्ज
पुणे, 18 जुलै 2017ः दक्षिण भारतांतील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिष्ठित रॅली मारूती सुझुकी दक्षिण डेअर या रॅलीच्या 9 व्या मालिकेला नुकताच प्रारंभ झाला आहे. ही रॅली महाराष्ट्रात प्रवेश करणार असून त्याव्दारे पश्चिम भारतांतही आपले पदार्पण साजरे करणार आहे.
या अत्यंत लोकप्रिय अशा रॅलीला बंगळुर येथे गेल्या रविवारी प्रांरभ करण्यात आला. सध्या ही रॅली चित्रदुर्ग, बेळगावच्या आव्हानात्मक पण सुंदर अशा परिसरातून प्रवास करत असून आपल्या प्रवासाच्या चौथ्या टप्प्यात ही रॅली 20 जुलै 2017 रोजी कोल्हापुर येथे पोहोचणार आहे. येथून ही रॅली 22 जुलै रोजी पुण्यात दाखल होणार आहे.
रॅलीच्या यावर्षीच्या नव्या शर्यत मार्गाबद्दल बोलताना मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे दक्षिण भारताचे व्यवसाय प्रमुख आनंद प्रकाश म्हणाले की, दरवर्षी या रॅलीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. या रॅलीसाठी गेल्या वर्षी आव्हानात्मक नवा ट्रॅक सादर केल्यानंतर यावर्षी नवनव्या सीमा ओलांडून रॅली महाराष्ट्रात आणताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या निमित्ताने दक्षिण भारतांतील आव्हानात्मक ट्रॅकबरोबरच पश्चिम भारतांतील खडतर ट्रॅकचा सामना स्पर्धकांना कारावा लागणार आहे. त्यामुळे स्पर्धा अधिक रोमांचकारी बनली असून चालकांचे कौशल्य पणाला लागणार आहे.
मारूती सुझुकी दक्षिण डेअर या रॅलीला 2009मध्ये प्रारंभ झाला तेव्हा ही केवळ तीन दिवस चालणारी टीएसडी रॅली होती. आता इतक्या वर्षानंतर ही रॅली पाच दिवस चालणारी देशांतील एकमेव आव्हानात्मक रॅली बनली आहे. तसेच, या रॅलीमध्ये एकस्ट्रिम कार, एकस्ट्रिम बाईक्स व एन्ड्युरन्स कार यांचा समावेश असतो. या रॅलीने याआधीच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा व गोवा हे दक्षिणेतील राज्ये पादाक्रांत केली आहेत. आता एकुण 180 स्पर्धकांचा समावेश असलेल्या या रॅलीचा पुण्यात समारोप होणार असून येत्या 22 जुलै रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.