पुणे (अभिषेक लोणकर )-गर्भश्रीमंत विरुद्ध सामान्य व्यक्ती असा स्पष्ट सामना दर्शवित अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक यंदा ऐतिहासिक निवडणूक ठरेल असे दिसते आहे . पूर्वी हि निवडणूक कधी केव्हा होत असत हेलोकांना समजत ही नसे पण आता जमाना बदलला आहे या जमान्यात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया मधून लोकांपर्यंत पोहोचणे तसे जिकीरीचे काम होवून बसले तरी फेसबुक व्हाटस अप च्या जमाण्याने या निवडणुकीचा ढोल एवढा वाजविला कि अभिनेत्री गटात १० अभिनेत्रींनी अर्ज भरीत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे . शिवाय कधी नव्हे तो आता या निवडणुकीत सर्वात प्रथमच महत्वाचे मुद्दे घेवून शरद लोणकर या उमेदवाराने आपला जाहीरनामा ही महिनाभर अगोदरच जाहीर केला आहे . ज्यास मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद सह सातारा कोल्हापूर मधून ही उत्कृष्ट जाहीरनामा असे म्हटले गेले .विजयराव चौधरी आणि विजय सावंत आणि उदय मराठे यांच्यातील ‘ माय मराठी ‘ नावाच्या पॅनलने या जाहीरनाम्याचे स्वागत केले आहे . जाहीरनाम्यात सध्या तीनच मुद्दे दिले असून केवळ या तीन कामासाठी आपण हि निवडणूक लढवीत असल्याचे शरद लोणकर यांनी म्हटले आहे
पहा काय आहे हा जाहीरनामा …

.आता पहा नेमके कोणी कोणी कोणत्या गटात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते पहा इथे….. ४ तारखेला छाननी होणार आहे तर ११ तारखेला माघारीची अंतिम मुदत आहे . त्यानंतर स्पष्ट होणार आहे अंतिम लढत …







