Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अ. भा.मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक – जे .के पाटलांचे नवे पॅनेल… ?

Date:

पुणे- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आता नव्या चेहऱ्यांचा शोध जुने जाणते नेते जे के पाटील यांनी ही सुरु केल्याने निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे पॅनेल पुन्हा उतरणार असल्याचे चित्र दिसत  आहे. विद्यमान संचालक मंडळात  जे के पाटील यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आलेल्या १२ सदस्यांचा तर मेघराज भोसले यांच्या २ सदस्यांचा समावेश असतानाही सत्ता हाती येताच या सर्व संचालकांनी आपापल्या नेत्यांनाच अव्हेरले आणि नेते आपोआप मंडळाच्या कारभारापासून दूर फेकले गेले होते . यातील मेघराज भोसले यांनी मात्र गेल्या २०१०  च्या  निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ही महामंडळाचे अध्यक्ष पद मिळवायचेच या इर्षेने गेली ५ वर्षे तयारी सुरु ठेवली आहे पण गोतावळ्याच्या  राजकारणात ते अडकून पडल्याने आणि त्यांची ध्येय्य धोरणे ही सभासदांना राजकारणापुरतीच  मर्यादित वाटू लागल्याचा आरोप होतो आहे या पार्श्वभूमीवर आता  जे के हेच नवी मोट बांधतील असा दावा करण्यात येतो आहे .
कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळाच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेला जे के यांची उपस्थिती पाहूनच याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या . शिवाय यावेळी मुंबईचे इम्पा चे संचालक बाळासाहेब गोरे देखील उपस्थित होते. दोघांचा यावेळी संवाद हि झाला . पण दोघांची युती असंभव असल्याचे ही यावेळीच स्पष्ट झाले . व्यासपीठावर नेत्यांनी निवडून आणलेले संचालक आणि गर्दीत कुठे तरी दिसणारे त्यांचे नेते हे चित्र तिथे स्पष्ट दिसले .  निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पुण्यातील तथाकथित नेत्याच्या एका म्होरक्याने  त्यांना यावेळी.. हि तुम्हीच दिलेली  ही पापी मंडळी आहेत अशी  दुषणे दिली तर तर अनेकांनी दादा आता चांगली माणसे पारखून निवडून  वेचून घ्या … तुम्हीच महामंडळाचे झाड  तुमच्या कारकिर्दीत निष्कलंकपणे फुलविले होते .. आता पुन्हा ना उमेद ना होता चांगला गट तयार करा, आताचे सारे एकाच माळेचे मणी आहेत , नवी प्रामाणिक फौज निर्माण करा असे सांगणारे देखील अनेकजण होते . या सर्व बाबी पाहता आणि नेत्यालाच अव्हेरणाऱ्या संचालक मंडळाचा कारभार पाहता जे के यांच्याबद्दल सभासदांमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे समजते . सध्याच्या  राजकारणात सभासदाला महामंडळाकडून काय मिळते, काय मिळाले आहे ? असाही सवाल केला जातो आहे
मुंबईतील चौघांनी तर पुण्यातील तिघांनी जे के यांच्याशी पॅनेल संदर्भात संपर्क हि साधला असून कोल्हापुरातील , सातारा , सांगलीतील काही मंडळी हि त्यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे .———————————–
विजय पाटकर यांच्याबद्दल मोठ्ठी नाराजी –
—————————————–
महामंडळाचे मावळते अध्यक्ष विजय पाटकर यांच्याबद्दल प्रसाद सुर्वे यांच्याहून अधिक नाराजी आहे … पाहू यात काय आहेत पाटकर यांच्यावर सभासदांचे आरोप  …
विजय पाटकर यांची ऑस्कर समितीत  निवडीनंतर  पुण्यातला सत्कार काहींनी  रद्द करणे भाग पाडले होते  , महामंडळाचे अध्यक्ष पद मिळाल्यावरही त्यांना  पुण्यात आणि पुणे कार्यालयात शिरकाव करणे मुश्कील  बनले होते त्या पाटकर यांना याप्रकरणी साथ देणाऱ्या सभासदांनी,प्रभात बचावो आंदोलनाची धुरा सांभाळली , महामंडळ पुणे कार्यालयाला जागा मिळवून देण्यासाठी महापालिकेत बैठक घेतली , अशा सर्व सभासदांकडे  पाटकर यांनी ‘गरज सरो वैद्य मरो’  च्या दृष्टीने पाहत त्यांना अव्हेरले . आणि फक्त स्वतःला किती चित्रपट मिळतात .? स्वतःची कशी कोण बडदास्त ठेवते यालाच प्राधान्य दिले एवढेच नव्हे तर पुणे कार्यालयात झालेला सुमारे ५ लाखाचा घोटाळा पाटकर यांच्याच कारकिर्दीत झाला तो घोटाळा त्यांनी मिडिया पासून लपवून ठेवला आणि त्याच्या वसुलीसाठी काहीही केले नाही यामुळे याबाबत त्यांच्याच कडे नजरा वळू लागल्या. त्यांच्याच कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांना अनुदानच दिले गेले नाही . अक्षरशः डावलण्यात आले . आणि अनेक कलावंतांचे मानधन बुडविण्याची आणि त्यावर प्रचंड दलाली खाण्याची प्रथा जणू कायदेशीररीत्या रूढ झाल्याचेच चित्र निर्माण झाले . मिडीयाच्या नावाने अनेक निर्माते यांना उल्लू बनविणाऱ्या एका दलालाची सातत्याने पाटकर यांनी सेवा घेत त्याचे गुणगान गायले . कोल्हापूरच्या सभेत तर त्यांनी चक्क दादागिरीच केली. पडद्यावर करतात त्याहून अधिक मोठ्ठ्या जोमाने येथे अभिनय केला आणि सभा – सभेचे विषय गुंडाळून नेले, आणि पळ काढला  . पुन्हा वर मुंबईत जावून कोल्हापूरच्या लोकांबद्दल तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले मुंबई-कोल्हापूर पुणे असे भेदाभेद निर्माण करणारी वक्त्यव्ये त्यांनी केली.

————————
प्रसाद सुर्वेंचे काय चुकले ?
————————-
२०१०  मध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी जे के पाटील यांच्या नेतृत्वाखालील
पॅनेल सर्वाधिक म्हणजे १४ पैकी १२ जागांवर विजयी झाले . तर मेघराज भोसले यांच्या पॅनेल चे केवळ दोघे जन विजयी झाले . यावेळी सुर्वे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली गेली . तेव्हा सत्ताधारी विरोधक असे सर्व एकत्रितरित्या नांदत होते . पण पुढे मेघराज भोसले यांनी विभागीय समित्या करा असा आग्रह धरला आणि वादाला प्रारंभ झाला त्यातच सुर्वे यांचे जे के पाटील यांच्याशी काय वाजले … ते अद्यापही गुलदस्त्यातच  आहे . सुर्वेंनी जे के यांचे नेतृत्व अव्हेरताच दुसरा अध्यक्ष होतो कि काय असे वाटत असतानाच सर्वच संचालक सुर्वे यांच्याच पाठीशी राहिले आणि त्यांनी ही जे के यांच्याशी संपर्क कमी केला .दरम्यान झाला,  पुण्यात मानाचा मुजरा नावाचा कार्यक्रम … ज्याला  १० लाख रुपये खर्चाची मंजुरी महामंडळाच्या सभेकडून घेण्यात आली . सुर्वे यांनी पुण्यातल्या ‘त्या’ दलालाची या कार्यक्रमासाठी मदत घेतली . त्याने ५० लाखापर्यत संपूर्ण नियोजन नेले . झी तुम्हाला पैसे देईल , स्पोन्सरशिप ही मी मिळवून देतो असे सांगणाऱ्या तथाकथित दलालाच्या मित्राने कार्यक्रम ८ दिवसावर येवून ठेपला असताना पळ काढला . इथे सुर्वे यांची फसगत झाली . महामंडळाचे आणि अध्यक्ष म्हणून आपले नाक कापण्याचा हा उद्योग पुण्यातून झाला यामुळे व्यथित झालेल्या सुर्वे यांनी कोणत्याही पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी करूनच दाखवायचा असा चंग बांधला आणि पुन्हा इथे ते फसले . त्यासाठी त्यांनी महामंडळाचे १० लाख नाही तर चक्क ५० लाख रुपये वापरले . सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता वापरलेले पैसे कार्यक्रम झाल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नातून पुन्हा जमा होतील हि त्यांची अडाणी आशा फोल ठरली.  झी ने त्यांना मानाचा मुजरा कार्यक्रमाचे  दिले २७ लाख रुपये .. आता उरलेल्या १३ लाखाचे काय ? त्यावरून सुरु झाले राजकीय आक्रंदन ..त्या राजकारणात हि ते फसले …  सर्वसाधारण सभेत  बोलून गेले … मी भरतो ते पैसे …
अशा रीतीने अडकत अडकत गेलेल्या  सुर्वेंवर पुढे  भ्रष्टाचाराचे आरोप आदळतच  गेले . अगोदर नेत्याला अव्हेरले . नंतर पुण्यातील ‘मानाच्या मुजरा’ त सापडले . पुढे आणखी राजकीय शिकार बनलेल्या सुर्वे यांना होणाऱ्या आरोपांनी हैराण केले , आणि  सुर्वे यांनी  मग राजीनामा ही देवून टाकला पण राजीनामा दिल्याने १३ लाखाचा प्रश्न सुटणार नव्हताच .म्हणून मग त्यांनी  आपला दबाव गट तयार देखील केला आणि लोकांचा वापर करायलाही सुरुवात केली .पाटकर अध्यक्ष झाल्यावर पुण्यातील कार्यालयीन बाबींवर नको तिथे, नको तेवढा सुर्वे यांनी भरोसा  टाकला आणि आणखी पाय खोलात घातले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...