Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

निर्माता गटातून समृद्धी पोरे चे मोठ्ठे आवाहान …

Date:

पुणे (अभिषेक लोणकर )

येत्या २४ एप्रिल ला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीतील निर्माता विभागात ९पॅनलचे ९ आणि १ स्वतंत्र असे  एकूण १० उमेदवार उभे असून यामध्ये सर्वांना निर्माती-अभिनेत्री समृद्धी पोरे यांचे मोठ्ठे आवाहन पेलावे लागेल काय ? असा प्रश्न विचारला जातो आहे. गेल्या निवडणुकीत विजयी होवून आलेले  महामंडळात सत्ताधारी १२ संचालक यांचे एक पॅनल होते आणि विरोधी पॅनल मेघराज भोसले यांचे होते त्यांचे २ संचालक महामंडळात होते . आता या निवडणुकीत मतदार या तथा कथित ३ तुकडे झालेल्या सत्ताधारी पॅनल ला ,कि  विरोधी पॅनल ला स्वीकारतील कि संपूर्णपणे नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देतील हे मतदानानंतरच  स्पष्ट होईल

नेमकी पहा कशी असेल लढत

निर्माता विभाग
) विजय कोंडके -कपबशी (विजय कोंडके पॅनल)
२)संजय पाटील -रिक्षा (प्रसाद सुर्वे पॅनल)
३)समृद्धी पोरे -समई(विजय पाटकर पॅनल)
४)मेघराज भोसले -पतंग (मेघराज भोसले पॅनल)
5)विजय शिंदे -विमान (बाळासाहेब गोरे पॅनल)
6)दीपक कदम- मशाल (दीपक कदम पॅनल)
७)लक्ष्मीकांत खाबिया -छत्री (खाबिया पॅनल)
८)विजय चौधरी -उगवता सूर्य (विजय चौधरी पॅनल)
९)दिलीप निकम- सायकल (मिनचेकर पॅनल)
१०)नारायण सूर्यवंशी -चंद्रकोर(स्वतंत्र उमेदवार -अपक्ष )

यातील कोंडके हे अनेक वर्षे महामंडळावर आहेत .त्यामुळे त्यांना ,’तुम्ही आजवर काय केले ‘ हे प्रश्न साहजिकपणे विचारले जात आहेत . त्यांच्या परीने ते उत्तरे देत आहेत . भोसले यांचा गेल्या निवडणुकीत ते पॅनलप्रमुख असले तरी अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्यांच्या निवडून आलेल्या २ सदस्यांनी महामंडळात काय केले ? तुम्ही नेते म्हणून काय करवून घेतले ? असे  प्रश्न त्यांना विचारले जावू शकतील .  गेली 5 वर्षे माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्र त्यांनी लीलया अवगत केले आहे . हि प्रसिद्धी त्यांच्या पथ्यावर पडणार कि अंगावर येणार असा प्रश्न आहे . या शिवाय समृद्धी पोरे यांचे आवाहन असूनही त्यांना पुण्यातील विजयराव चौधरी आणि लक्ष्मीकांत खाबिया यांचे आवाहन पेलता येणार काय ? असा हि प्रश्न आहेच . यातील विजयराव चौधरी यांचा चेहरा अगदी नवा आहे . कोरी पाटी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल.

तसे मुंबईतील  पाटकर यांच्या पॅनल मधून उभ्या राहिलेल्या समृद्धी पोरे यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आहे . आणि त्यंच्या शब्दाला सर्वाधिक किंमत राहील हि त्यांची जमेची बाजू असली तरी बाळासाहेब गोरे आणि दीपक कदम म्हणजे विमान आणि मशाल अशा दोघांशी त्यांना सामना करायचा आहे . कोल्हापूरचे रणजीत मिनचेकर पॅनल हि दुर्लक्षित करून चालणार नाही . या विभागात प्रसाद सुर्वे यांच्या उमेदवाराला कोल्हापूरकर स्वीकारतील असा कोणी दावा करणार नाही . पण मिनचेकर या विभागातील आपल्या उमेदवारासाठी किती जोर लावणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे . पुण्या मुंबईत ३/३ पॅनल मध्ये किती विभागणी होणार यावर मिनचेकर यांचे लक्ष आहे .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...