पुणे- मराठा क्रांती मोर्चाने आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले, विविध पक्षांचे आणि मराठा संघटनांचे नेते यावेळी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते . यावेळी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या समोरील उंचावर असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नामफलकावर चढलेल्या युवकाला खाली उतरविण्यात आले तर मोबाईल टॉवर वर झेंडा लावायला गेलेल्या दोघांना खाली उतरविण्यात आले . त्यानंतर दुपारी साडेबारानंतर मराठा नेते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला त्यांच्या पाचव्या मजल्यावरील कार्यालयात गेले .मात्र याचवेळी खाली कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘खाली या ,खाली या ‘ अशा घोषणा देत जमावा ने संताप व्यक्त केला , हा जमाव नेत्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . अखेर नेते निवेदन देवून निघून गले पण जमाव प्रवेशद्वारावर संरक्षक कडे भेदण्याच्या प्रयत्नात झुंजत च राहिला .. पहा हि व्हिडीओ झलक ….