छत्तीसगड आणि झारखंडच्या ‘बुढापहाड’ आणि बिहारच्या चक्रबंधा आणि भीमबांध या अत्यंत दुर्गम भागातून माओवाद्यांना हुसकावले आणि सुरक्षा दलाच्या कायमस्वरूपी छावण्या उभारल्या .

Date:

हे सर्व भाग जहाल माओवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी केले जप्त

वर्ष 2022 मध्ये, सुरक्षा दलांना ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबंधामध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे.छत्तीसगडमध्ये 7 माओवादी ठार झाले आणि 436 अटक/आत्मसमर्पण /4 माओवादी झारखंडमध्ये ठार झाले तर 120 अटक/आत्मसमर्पण केले. बिहारमध्ये 36 माओवाद्यांची अटक / आत्मसमर्पण मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 माओवाद्यांना ठार केले आहे

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्षलवाद – मुक्त भारताच्या संकल्पनेला मूर्त रूप देणे आणि नक्षलवाद अजिबात खपवून न घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शून्य सहिष्णुता धोरण याला अनुसरून नक्षलवादविरोधात गृह मंत्रालय निर्णायक लढाईच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नक्षलवादविरोधात सुरू असलेल्या लढ्यात आज सुरक्षा दलांनी निर्णायक विजय मिळवला.

नक्षलवादविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा परिणाम म्हणून, प्रथमच छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर स्थित ‘ बूढा पहाड़ ‘ आणि बिहारच्या चक्रबांध आणि भीमबांधच्या अति दुर्गम भागात प्रवेश करून नक्षलवाद्यांना त्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानातून हुसकावून लावण्यात आले आणि तिथे सुरक्षा दलांच्या कायमस्वरूपी छावण्या उभारल्या आहेत. हे संपूर्ण क्षेत्र देशातील  प्रमुख नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले होते आणि या ठिकाणी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा, विदेशी ग्रेनेड्स, एरो बॉम्ब आणि आयईडी जप्त केले .

नक्षलवाद्यांविरोधात 2019 पासून विशेष रणनीती अवलंबली जात आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दले आणि संबंधित यंत्रणांचे समन्वित प्रयत्न आणि राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे नक्षलविरोधी लढ्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.

या निर्णायक यशाबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफ आणि राज्य सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आणि सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालय नक्षलवाद आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण सुरूच ठेवेल आणि हा लढा अधिक तीव्र केला जाईल.

2022 मध्ये नक्षलवाद्यांविरोधातल्या लढ्यात सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑक्टोपस, ऑपरेशन डबल बुल, ऑपरेशन चक्रबांधमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये 7 नक्षलवादी मारले गेले आणि 436 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. झारखंडमध्ये 4 नक्षलवादी ठार झाले आणि 120 जणांना अटक झाली किंवा त्यांनी शरणागती पत्करली. बिहारमध्ये 36 नक्षलवाद्यांना अटक झाली / आत्मसमर्पण केले. तसेच मध्य प्रदेशात सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. 1 कोटी रुपयांचे बक्षीसअसलेल्या मिथिलेश महतो प्रमाणेच   यात ठार झालेल्या अनेक नक्षलवाद्यांवर लक्षावधी-कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते हे यश महत्त्वाचे ठरते कारण.

2014 पूर्वीच्या तुलनेत, नक्षलवादी हिंसाचाराच्या घटना 77 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2009 मध्ये 2,258 इतक्या सर्वोच्च हिंसाचाराच्या घटना झाल्या होत्या. 2021 मध्ये या घटना 509  या संख्येपर्यंत खाली आल्या आहेत. हिंसाचारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ही 85 टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2010 मध्ये, ही मृत्यूची संख्या 1005 अशी सर्वाधिक होती. ती 2021 मध्ये 147 मृत्यु  इतकी कमी झाली. नक्षलवाद्यांच्या प्रभाव क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रभावाचे क्षेत्रही लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. 2010 मध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव  देशभरातील 96 जिल्ह्यांमध्ये होता. 2022 मध्ये त्यांचे केवळ 39 जिल्ह्यांवर त्यांचे वर्चस्व उरले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काैसरबागेत कार पार्किंगवरून हाणामारी:तलवारीने वार

पुणे -काेंढवा परिसरातील काैसरबाग याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरुन...

ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुलुंडमध्ये रंगणार `पुकारता चला हूं मैं’!

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड आशिष शेलार यांची संकल्पना कालिदास नाट्यमंदिरात रसिकांना...

पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा लाडके उद्योगपती अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपा सरकार घाट: हर्षवर्धन सपकाळ.

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी...