‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Date:

‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ या वाक्यामुळे आणि ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या धम्माल गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेल्या बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे, तर प्रणव रावराणे आणि सायली संजीव यांची जोडी मुख्य भूमिकेत आहे.

‘आटपाडी नाईट्स’ च्या अतिशय भन्नाट असलेल्या ट्रेलर मध्ये असे दिसते की, ज्योतिषाने भविष्यवाणी केल्याप्रमाणे वसंत बापूसाहेब खाटमोडे उर्फ वश्या याचे लग्न एका सुंदर सुलक्षणी मुलीशी जुळले आहे. वश्या आपल्या मित्रांशी गप्पा मारताना म्हणतोय ‘माझ्या बायकोला मी वर्जिन भेटणार हाय वर्जिन, लग्नाआधी तिच्या अंगाला टच सुद्धा करणार नाही’. तर वश्याची प्रिया आपल्या मैत्रीणींना सांगते ‘गडी दिसतो तसा नाही, लय रोमांटीक हाय’. हे सगळं धमाल मस्तीत सुरू असलं तर एक ट्विस्ट येतो तो म्हणजे वश्या एका बंगाली बाबाकडे जाऊन म्हणतोय ‘थोडा उसका प्रॉब्लेम है’. आता वश्याचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? आणि तो कसा सुटणार? याची उत्कंठा या ट्रेलरमुळे वाढली आहे.

एका संवेदनशील विषयावर हलक्या फुलक्या अंदाजात भाष्य करणारा  ‘आटपाडी नाईट्स’ ची निर्मिती मायदेश मीडिया यांनी केली आहे, या चित्रपटात प्रणव आणि सायली यांच्यासह सुबोध भावे, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर, स्व. विवेक राजेश, डॉ. सुधीर निकम, अनुजा प्रभूकेळुसकर यांच्या भूमिका आहेत. वश्याचा प्रॉब्लेम जाणून घेण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...