२८ जुलै २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा फिल्मी किडा निर्मित,मला काहीच
प्रॉब्लेम नाही; हा आगामी मराठी चित्रपट आता येत्या ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. २८
जुलै ला प्रदर्शित होणाऱ्या चार हिंदी व दोन मराठी चित्रपटांमुळे प्रेक्षकांना मला काहीच प्रॉब्लेम नाही
बघताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या चित्रपटाची रिलीज डेट ११ ऑगस्ट करण्यात आलेली आहे.
११ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'मला काहीच प्रॉब्लेम नाही; या
चित्रपटाद्वारे स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, निर्मिती सावंत, कमलेश सावंत, विजय निकम,
मंगल केंकरे, साहील कोपर्डे, सीमा देशमुख, आरश गोडबोले, स्नेहलता वसईकर व सतीश
आळेकर यांसारखे नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर बेला शेंडे,
अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि श्रृती आठवले आणि यांच्या आवाजाने
सजलेली एकापेक्षा एक गाणी ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.
जसराज ने संगीत दिग्दर्शनाबरोबरच या चिपटात दोन गाण्यांना आवाजही दिला आहे. ज्याचा
आस्वाद ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटातून घेता येणार आहे.
प्रत्येक नातं टिकविण्यासाठी ते वेळोवेळी फुलवतं ठेवावं लागतं. आपल्या आधीची एक पिढी आणि
आपली पिढी यांच्या विचारांचा आणि तत्वांचा हा प्रवास समीर विद्वांस दिग्दर्शित 'मला काहीच प्रॉब्लेम
नाही’ चित्रपटाद्वारे येत्या ११ ऑगस्टला आपणास पाहायला मिळणार आहे.