फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित मला काहीच प्रॉब्लेम नाहीया ११ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात
प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशन्सला आता सुरूवात झाली आहे. भविष्याच्या मागे धावता धावता
आपण वर्तमानात जगायचंच विसरतो याची जाणीव करून देण्यासाठी वेळात वेळ काढून स्पृहा आणि
गश्मीर समवेत ;मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटाच्या संपूर्ण टीम ने त्यांच्या छोट्या तनय म्हणजेच
आरश गोडबोले याच्या इच्छेखातर नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स अशी जोमदार क्रिकेटची मॅच
खेळवली.
नागपूर पँथर्स विरुद्ध कोकण वॉरिअर्स नावातूनच नागपूर विरुद्ध कोकण असा सामना रंगलेला होता
हे कळतं. असं का बरं असावं? तर त्याच कारण म्हणजे, मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणतं असलेला
अजय म्हणजेच गश्मीर नागपूर चा तर केतकी म्हणजेच स्पृहा कोकणची असल्यामुळे ते आपापल्या
परिवारासह आपल्या गावांना प्रतिनिधित्व करत होते. एकीकडे विजय निकम, स्नेहलता वसईकर,
साहील कोपर्डे, करण भोसले यांची गश्मीरला तगडी साथ होती तर दुसरीकडे सीमा देशमुख, सुरभी
हेमंत, आरश गोडबोलेच नव्हे तर चित्रपटाचे निर्माते रवि सिंग आणि रिचा सिन्हा यांचा स्पृहावर गाढ
विश्वास. स्पृहाच्या कोकण वॉरिअर्सला सपोर्ट करत मास्टर आरशने टॉस केला. गश्मीर ने टॉस जिंकून
पहिली बॅटिंग घेऊन ६ ओव्हर्स मध्ये ८६ धावा काढल्या. तर पूर्णपणे आत्मविश्वासाच्या बळावर खेळत
असलेल्या स्पृहाने ३ वेळा आऊट होऊन, गश्मीरच्या बॉलिंगने जखमी होऊन देखील ६ ओव्हर्स मध्ये
तब्बल ३८ धावा घेत आपल्या टीमला पुढच्या मॅच मध्ये आपणच जिंकणार असल्याचं आश्वासन दिलं.
ह्या सर्वांत घडलेली मजेशीर गोष्ट म्हणजे मॅचच्या सुरूवातीला आईला सपोर्ट करणारा त्यांचा छोटा
तनय म्हणजेच आरश गोडबोलेने मॅच च्या अखेरीस स्वतःची टीम बदलून तो बाबांच्या टीम मध्ये
गेला.