महिंद्राची संपूर्णतः नवी स्कॉर्पियो-एन बनली ५-स्टार ग्लोबल एनसीएपी रेटिंग जिंकणारी पहिली बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही

Date:

मुंबई, 15 डिसेंबर २०२२: सुरक्षित एसयूव्ही बनवण्याची परंपरा असलेल्या, भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या या वाटचालीत एक नवा टप्पा पार केला आहे.  महिंद्राची संपूर्णतः नवी स्कॉर्पियो-एन ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रामच्या (जीएनसीएपी) नवीन क्रॅश टेस्ट नियमांनुसार ५-स्टार रेटिंग मिळवणारी पहिली बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही बनली आहे. हे नियम १ जुलै २०२२ पासून लागू करण्यात आले आहेत. 

महिंद्राच्या संपूर्णतः नवीन स्कॉर्पियो-एनला वयस्कर आणि बाल प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि सुविधांसाठी अनुक्रमे ५-स्टार व ३-स्टार रेटिंग मिळाले आहे. याशिवाय स्कॉर्पियो-एनने काही अतिरिक्त टेस्ट्स देखील यशस्वीपणे पूर्ण केल्या असून त्यामध्ये जीटीआर८ आणि त्याच्या फिटमेंट, साईड हेड प्रोटेक्शन एअरबॅग फिटमेंटनुसार पोल साईड इम्पॅक्ट, पेडिस्ट्रियन प्रोटेक्शन यूएन१२७, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) यांचा समावेश आहे. त्यामुळे स्कॉर्पियो-एन ही नवीन जीएनसीएपीच्या क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल्सनुसार ५-स्टार रेटिंग मिळवणारी पहिली बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही बनली आहे.

जून २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आलेली स्कॉर्पिओ-एन ही महिंद्राची एक्सयूव्ही७०० आणि एक्सयूव्ही३०० नंतरची ५-स्टार रेटिंग मिळवणारी तिसरी एसयूव्ही बनली आहे. महिंद्रा एक्सयूव्ही३०० ही २०२० मध्ये भारतातील पहिले ‘सेफर चॉईस’ अवॉर्ड (जीएनसीएपीकडून) जिंकल्यानंतर ५-स्टार अडल्ट सेफ्टी रेटिंग जिंकणारी महिंद्राची पहिली एसयूव्ही बनली आहे. त्यापाठोपाठ २०२१मध्ये एक्सयूव्ही७०० ने हा पुरस्कार जिंकला. महिंद्राची इतर बॉडी-ऑन-फ्रेम वाहने थार आणि माराझ्झो यांना देखील अनुक्रमे २०२० आणि २०१८ मध्ये ४-स्टार रेटिंग मिळाले होते. अशाप्रकारे महिंद्रा भारतामध्ये सुरक्षित एसयूव्ही बनवण्यात नवे मापदंड निर्माण करत आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे प्रेसिडेंट श्री. वेलूसामी आर यांनी सांगितले, सुरक्षितता हा आमच्या उत्पादन विकास प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. नव्या ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट नियमांनुसार ५-स्टार रेटिंग मिळवून ऑल-न्यू स्कॉर्पियो-एन ही पहिली ग्लोबल एनसीएपी ५-स्टार बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही बनली आहे. ऑल-न्यू स्कॉर्पियो-एनमध्ये श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता कामगिरी बजावून आम्ही बॉडी-ऑन-फ्रेम वाहनांप्रती आमचा अनोखा उत्पादन विकास दृष्टिकोन दर्शवला आहे. अधिकाधिक सुरक्षित एसयूव्ही बनवणे हे आमचे मिशन आहे.  थर्ड-जनरेशन बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्म हा प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षा मिळवून देऊन ऊर्जा अधिक जास्त क्षमतेने शोषून घेऊनऑल-न्यू स्कॉर्पियो-एनसाठी श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्याबरोबरीनेच एसयूव्हीची अस्सल वैशिष्ट्ये प्रदान करत असताना जास्तीत जास्त आराम मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

ग्लोबल एनसीएपीचे सेक्रेटरी जनरल अलेजांड्रो फुरस यांनी सांगितले, सुरक्षिततेप्रती सातत्यपूर्ण वचनबद्धताआमच्या नवीन आणि अधिक आव्हानात्मक क्रॅश टेस्ट नियमांनुसार वयस्कर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५-स्टार मिळवल्याबद्दल ग्लोबल एनसीएपीतर्फे आम्ही महिंद्राचे अभिनंदन करतो.

ऑल-न्यू स्कॉर्पियो-एन तिच्या रोमांचकारी कामगिरीसाठी ओळखली जाते. या गाडीवर प्रत्येकाची नजर खिळून राहते. प्रीमियम क्राफ़्टेड इंटिरियर्स, शानदार राईड आणि सुबक हाताळणी, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साध्य करण्यात आलेली ‘गो एनीव्हेयर’ क्षमता ही या गाडीची अतुलनीय वैशिष्ट्ये आहेत.  ग्लोबल एनसीएपी न्यू क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल्समध्ये ५-स्टार रेटिंग मिळाल्यामुळे भारतातील सर्वाधिक हवीशी वाटणारी एसयूव्ही अशी स्कॉर्पियो-एनची प्रतिष्ठा वाढली आहे.

ऑल-न्यू स्कॉर्पियो-एनची काही लक्षणीय सुरक्षा वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • अत्याधुनिक बॉडी-ऑन-फ्रेम प्लॅटफॉर्म
  • ६ एअरबॅग्स
  • ड्राइव्हरला मरगळ, झोप येत आहे हे ओळखण्याचे तंत्रज्ञान
  • इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी)
  • अत्याधुनिक एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) + ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन)
  • हिल डिसेंट कंट्रोल
  • हिल होल्ड कंट्रोल
  • व्हेईकल डायनामिक्स कंट्रोल (व्हीडीसी)
  • रोल ओव्हर मिटिगेशन (आरओएम)
  • व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक्स (फ्रंट + रियर)
  • इसोफिक्स/आय-साईझ कॉम्पॅटिबिलिटी
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम
  • फ्रंट व रियर कॅमेरा
  • फ्रंट व रियर पार्किंग सेन्सर्स
  • एलईडी सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर
  • ई-कॉल आणि एसओएस स्विच
  • अड्रेनॉक्स कनेक्ट, अलेक्सा बिल्ट-इन

*गाडीच्या प्रत्येक प्रकारामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मविआला झुलवत तुतारी मिळाली अखेर घड्याळाला?

चर्चा, उत्सुकता,गोंधळ आणि शेवटी सारे काही सत्तेच्या बाकावर बसण्यासाठी,विरोधात...

भाजप: बंडखोरी रोखण्यासाठी यादी नाही,थेट फोन करून देणार AB फॉर्म

पुणे :भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव...

भाजपा कार्यालयासमोर दलीत, रिपब्लिकन कार्यकर्ते करणार निदर्शने

पुणे: भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून उमेदवारी देताना दलीत आणि मागासवर्गीय,...

भाजपाच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन

पुणे, दि. २८ : भारतीय जनता पक्षाच्या डिजिटल प्रचार...