भारतात सर्वत्र 9.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या आकर्षक दरामध्ये उपलब्ध
नाशिक: महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम) या भारतातील प्रीमिअम एसयूव्ही उत्पादकाने आज मराझ्झो दाखल केली. मराझ्झोमध्ये सर्वोकृष्ट अभियांत्रिकीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आरामदायी व तत्पर नियंत्रण, शांत केबिन, शीघ्र कूलिंग व आतमध्ये ऐसपैस जागा अशा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजपासून, भारतभरातील महिंद्रा डीलरशिपमध्ये मराझ्झो M2 प्रकारासाठी 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीपासून उपलब्ध होणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले, “मराझ्झो दाखल करणे, हा महिंद्राच्या केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील वाटचालीतला अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका (एमएएनए) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) यांचा उत्पादन विकसित करण्याचा पहिला संयुक्त प्रयत्न असलेली मराझ्झो आमच्या ‘राइज’ या विचासरणीचे हुबेहूब प्रतिबिंब आहे. आमच्यासाठी कायापलट ठरेल, असे वाहन तयार करण्यासाठी आमच्या टीमनी चाकोरीबाहेर विचार केला व सर्व मर्यादांवर मात केली. आम्ही नव्या विश्वामध्ये प्रवेश करत आहोत आणि यापुढेही अशी वाहने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
वाहन दाखल करत असातना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, “महिंद्राच्या नव्या, जागतिक दृष्टिकोनाची झलक मराझ्झोमध्ये दिसून येते. हे वाहन उत्कृष्ट ठरण्यासाठी डेट्रॉइटमध्ये तयार केले आहे, त्याची आखणी इटलीतील पिनिनफरिनाच्या सहयोगाने आमच्या इन-हाउस टीमने केली आहे, तसेच हा संपूर्ण प्रकल्प चेन्नईजवळील एमआरव्ही या आमच्या अद्ययावत संशोधन व विकास प्रकल्पात साकारला आहे. ग्राहकांना अद्वितीय गुणवत्ता व खऱ्या अर्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या आमच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनांना मराझ्झोमुळे नवी दिशा मिळाली आहे.”
महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, “महिंद्राच्या यूव्ही श्रेणीच्या वाटचालीमध्ये मराझ्झोने नवा अध्याय रचला आहे. उत्तमोत्तम उत्पादने निर्माण करणे व नव्या श्रेणी तयार करणे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. मराझ्झोच्या निमित्ताने आम्ही ही परंपरा कायम राखली आहे. आकर्षक स्टाइल, आरामदायी प्रवास, तत्पर नियंत्रण, ऐसपैस जागा, उत्तम एनव्हीएच स्तर व आकर्षक किंमत अशा खास वैशिष्ट्यांमुळे मराझ्झो सर्वांची पसंती मिळवणार आहे, असा विश्वास आहे”.
मराझ्झोविषयी:शार्कपासून प्रेरित डिझाइन: मराझ्झोचे शार्कपासून प्रेरित असलेले डिझाइन वाहनाच्या स्लीक व स्ट्रीमलाइन्ड आकारातून अधोरेखित होते. फ्रंट ग्रिल शार्कच्या दातासारखे दिसते, तर टेल लॅम्प शार्कच्या शेपटीसारखे व अँटिना शार्क-फिनप्रमाणे आहे. प्रोजेक्टर हेडलॅम्प, डेटाइम रनिंग लॅम्प असलेले फॉग लॅम्प, बाह्यभागावर देखणे क्रोम फिनिश, ट्विन-स्पोक 17” मशीन्ड अलॉय व्हील्स यामुळे मराझ्झो अधिक रूबाबदार दिसते.
पेटण्टेड बॉडी-ऑन-फ्रेम, फ्रंट-व्हील ड्राइव्ह रचना: मराझ्झोमध्ये विशेष, जगातील पहिली रचना केलेली असून त्यामुळे चालकाला एखादी कार चालवल्याप्रमाणे अनुभव येतो, या श्रेणीतील अन्य वाहनांच्या तुलनेत हे वाहन वजनाने हलके आहे, शिवाय बॉडी-ऑन-फ्रेम कॉन्फिगरेशनमुळे त्यास दणकटपणा मिळाला आहे.
आरामदायी व सोपे नियंत्रण: मराझ्झोच्या रिअर सस्पेन्शन रचनेमध्ये वजनाने हलके “ट्विस्ट बीम” आहे व त्यामुळे गाडी चालवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे सोयीचे होते, तसेच या श्रेणीतील 245 मिमी इतके सर्वाधिक सस्पेन्शन ट्रॅव्हल मिळते. मराझ्झोच्या चासीमध्ये फुल्ली बॉक्स्ड फ्रेमचा वापर केला असून त्यामध्ये फोर्ज्ड अल्युमिनिअम फ्रंट सस्पेन्शन कम्पोनंट्सचा समावेश आहे, ज्यामुळे वाहनाचे नियंत्रण वाढते. फ्रंट व्हील ड्राइव्ह रचनेमुळे पुढील चाकांना ताकद पुरवली जाते व त्यामुळे वाहन हाताळणे सोपी व सुरक्षित ठरते.
या श्रेणीतील पहिल्यावहिल्या इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंगमुळे मायलेज, स्टीअरिंगचा अनुभव व मॅन्युव्हरिंग यामध्ये सुधारणा होते. मराझ्झोला सर्वोत्कृष्ट 5.25 मीटरचा टर्निंग रेडिअस असल्याने चालकाला प्रतिकूल स्थितीतही गाडी सहज चालवणे शक्य होते.
8 प्रवासी बसू शकतील इतकी ऐसपैस जागा: मराझ्झोच्या विशिष्ट डिझाइनमुळे केबिनमधील सर्व 3 रांगांमधील जागा वाढली आहे व वाहनाची लांबी न वाढवताही 8 प्रवासी आरामात बसू शकतात. यामुळे हे वाहन या श्रेणीतील सर्वात आटोपशीर, तरीही ऐसपैस ठरते. मराझ्झो आपल्या श्रेणीतील उत्तम दर्जाची पहिल्या व दुसऱ्या रांगेतील शोल्डर रूम प्रदान करते आणि आरामदायी लेगरूममुळे 6 फूट उंच असलेल्या व्यक्तीलाही पाय लांब करून निवांत बसता येऊ शकते. याचबरोबर, वाहनाची स्टेप-इन हाइट 465 मिमी आहे व त्यामुळे साडी नेसलेल्या महिला किंवा वयस्कर व्यक्तीलाही फूटबोर्डचा वापर न करता गाडीत बसणे शक्य होते.
मराझ्झो 7-आसनी व 8-आसनी या पर्यायांत उपलब्ध होईल, तसेच 7-आसनी पर्यायात दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीटची व्यवस्था आहे. 8-आसनी पर्यायात दुसऱ्या व तिसऱ्या रांगा पूर्णतः दुमडल्यानंतर 60:40 विभागात सामानासाठी 1055 लिटर जागा उपलब्ध होते.
या श्रेणीतील सर्वात शांत केबिन: मराझ्झोच्या एअरोडायनॅमिक डिझाइनमुळे, पॉवरट्रेन व रोड एनव्हीएचचा आवाज गाडीच्या आतमध्ये येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. मराझ्झोमध्ये 1.5 लिटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन असून ते कमी आवाज, कमी कंपने या दृष्टीने तयार केले आहे. यामुळे या वाहनातील केबिन या श्रेणीतील सर्वात शांत केबिन ठरते. चालकाला एकूण येणारा आवाज केवळ 43 डेसिबल्स इतकाच असतो (लो आयडलवर असतानाचा).
या श्रेणीतील शीघ्र कूलिंग: मराझ्झोमध्ये या उद्योगातील पहिली ‘सराउंड कूल टेक्नालॉजी’ वापरली आहे, याचसोबत फुल्ली ऑटोमॅटिक टेम्प्रेचर कंट्रोलच्या (एफएटीसी) सहाय्याने या श्रेणीतील अन्य वाहनांच्या तुलनेत या वाहनाचे केबिन वेगाने थंड होते (प्रति सेकंद 36 मीटर हवेचा प्रवाह). ‘सराउंड कूल टेक्नालॉजी’च्या मदतीने प्रवाशांना डायरेक्ट मोड व डिफ्युज्ड मोड या पर्यायांची सुविधा प्राप्त होते.
प्रीमिअम इंटिरिअर्स:
- पर्ल व्हाइट, पियानो ब्लॅक व क्रोम फिनिश असलेले प्रीमिअम ड्युएल-टोन्ड इंटिरिअर
- चालकासाठी उंची कमी-अधिक करता येईल व कंमबरेला आधार मिळेल अशी रचना असलेली काँटोर-मॅप्ड लेदर सीट
- जांभळा प्रकाश असलेले भविष्यात्मक क्लस्टर व विमानापासून प्रेरित असलेले पार्किंग ब्रेक
- तिसऱ्या रांगेतील प्रवाशाला आत जाणे व बाहेर येणे शक्य होण्यासाठी दुसऱ्या रांगेत डावीकडील सीटला वन-टच टम्बल डाउन लिव्हर आहे
- दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी या श्रेणीतील पहिलेवहिले सनशेड
कार्यक्षमता: मराझ्झोचे दर्जेदार 1.5 लिटर 4-सिलिंडर इंजिन हे आडवे (पूर्व-पश्चिम) असून, त्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते. हे इंजिन 90.2kW (121 BHP) ताकद व 300 Nm टॉर्कची निर्मिती करते आणि त्याची रचना कमी आवाज, कंपने होतील, या दृष्टीने केली आहे. हे इंजिन एआरएआय-प्रमाणित 17.3 किमी प्रति लिटर मायलेज देते.
सर्वांच्या सुरक्षेची दक्षता: मराझ्झोच्या सर्व प्रकारांमध्ये सुरक्षाविषयक पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे –
- ड्युएल फ्रंट एअरबॅग
- सर्व 4 चाकांवर या उद्योगातील पहिलेवहिले डिस्क ब्रेक
- ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स
- फुल्ली-बॉक्स्ड फ्रेम असलेले अत्यंत ताकदीचे स्टील स्ट्रक्चर, कोलॅप्सिबल स्टीअरिंग कॉलम, क्रम्पल झोन्स, साइड-इम्पॅक्ट बीम्स
- इम्पॅक्ट-सेन्सिटिव्ह डोअर लॉक्स
- अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस)
M6 व M8 प्रकारांमध्ये रिअर पार्किंग कॅमेरा व सेन्सर्स, या श्रेणीतील पहिले इमर्जन्सी कॉल व कॉर्नरिंग लॅम्प यांचा समावेश
तंत्रज्ञान:18 सेमी (7″) कलर टच स्क्रीन इन्पोटेन्मेंट सिस्टीम: हॅप्टिक्स व कॅपसेन्स तंत्रज्ञान, आयपॉड तंत्रज्ञान, पिक्चर व्ह्यूअर, यूएसबी ऑडिओ/व्हीडिओ, ब्लुटूथ ऑडिओ
- ऑन-बोर्ड नेव्हिगेशनसह क्लस्टरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन इंडिकेटर
- कनेक्टिविटीमध्ये अँड्रॉइड ऑटो, इमर्जन्सी कॉल असलेले महिंद्रा ब्लु सेन्स अॅप
- म्युझिक सिस्टीमसाठी व्हॉइस अॅक्टिव्हेटेड कंट्रोल्स आणि इन्फोटेन्मेंट व एसएमएस रीड आउट यासाठी व्हॉइस रेकगनिशन अशी व्हॉइस असिस्ट फीचर्स
- स्टीअरिंग-माउंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल्स
सोयीची वैशिष्ट्ये: साइड टर्न इंडिकेटर्स व एन्ट्री असिस्ट लॅम्प असलेले पॉवर-फोल्डेबल ओआरव्हीएम, फॉलो-मी-होम व लीड-मी-टू-व्हेइकल हेडलॅम्प, सर्व्हिस रिमांइडर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, सनग्लास होल्डर, कॉन्व्हर्सेशन मिरर, प्रत्येक रांगेत कप-होल्डर व सर्व 4 दारांमध्ये बॉल-होल्डर, मल्टिपल चार्जिंग व मीडिया आउटलेट.
- डेट्रॉइटमधील महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका (एमएएनए) आणि चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) यांच्यातील अभियांत्रिकीविषयक सहयोगातून निर्माण झालेल्या मराझ्झोची निर्मिती करताना आरामदायी प्रवास, तत्पर नियंत्रण, केबिनमध्ये शांतपणा, जलद कूलिंग व ऐसपैस जागा या वैशिष्ट्यांची दक्षता घेतली आहे
- इटलीतील पिनिनफरिना व मुंबईतील महिंद्रा डिझाइन स्टुडिओ यांच्या सहयोगातून तयार झालेले मराझ्झोचे शार्ककडून प्रेरित असलेले व लक्षवेधक डिझाइन स्ट्रीमलाइन्ड व एअरोडायनॅमिक आहे. गाडीचे ग्रिल शार्कच्या दातांप्रमाणे आक्रमक दिसते व टेल लॅम्प शार्कच्या शेपटीसारखे दिसतात.
- मराझ्झोचे पेटण्टेड ‘बॉडी-ऑन-फ्रेम-फ्रंट-व्हील-ड्राइव्ह’ रचनेचे दोन फायदे मिळतात, तत्पर व कारसारखे नियंत्रण मिळते, तसेच बॉडी-ऑन-फ्रेम कॉन्फिगरेशनमुळे टिकाऊपणा व दणकटपणा मिळतो
- या श्रेणीतील सर्वाधिक सस्पेन्शन ट्रॅव्हल (245 मिमी) देणाऱ्या ‘ट्विस्ट बीम’ रिअर सस्पेन्शनमुळे मराझ्झो आरामदायीपणे चालवता येते
- मराझ्झोच्या पहिल्या व दुसऱ्या रांगेत सर्वोत्तम शोल्डर रूम उपलब्ध असल्याने 8 जण आरामात बसू शकतात. मराझ्झोच्या कमी स्टेप-इन उंचीमुळे, फूटबोर्डची मदत न घेता गाडीमध्ये बसणे व उतरणे अधिक आरामदायी होते.
- गाडीमध्ये वापरलेली या उद्योगातील पहिलीवहिली ‘सराउंड कूल टेक्नालॉजी’ तुम्हाला डायरेक्ट व डिफ्युज्ड मोड असे पर्याय देते व या श्रेणीतील शीघ्र कूलिंगही देते
- मराझ्झोचे 4-सिलिंडर इंजिन हे 90.2kW (121 BHP) ताकद व 300 Nm टॉर्क या श्रेणीतील सर्वाधिक ताकद व टॉर्क देते
- मराझ्झोचे एअरोडायनॅमिक डिझाइनव नवे, आधुनिक, कमी-एनव्हीएच इंजिन यामुळे प्रवाशांना या श्रेणीतील सर्वात शांत केबिनचा अनुभव मिळतो
- मराझ्झोच्या सर्व प्रकारांमध्ये सर्व 4 चाकांसाठी या श्रेणीतील पहिलेवहिले डिस्क ब्रेक, ड्युएल फ्रंट एअरबॅग, या श्रेणीतील पहिलीवहिली इमर्जन्सी कॉल, एबीएस व ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स ही वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हे वाहन ऑक्टोबर 2020 मधील सुरक्षाविषयक नियमांचे पालन करते.
- स्पोर्ट्स प्रीमिअम ड्युएल टोन इंटिरिअर व काँटोर-मॅप्ड लेदर सीट, हॅप्टिक व कॅपसेन्स तंत्रज्ञानाचा वापर केलेले 18 सेमी कलर टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट, पियानो ब्लॅक डॅशबोर्ड, दुसऱ्या रांगेसाठी या श्रेणीतील पहिलीवहिली सन शेड्स, अशी मराझ्झोची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
- 7 आसनीमध्ये दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट पर्याय उपलब्ध असून, 7 व 8 आसनी कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध
- 4 प्रकारांमध्ये उपलब्ध – M2, M4, M6, M8 – व 6 रंगांमध्ये उपलब्ध – मरिनर मरून, पोसिडन पर्पल, अक्वा मरिन, आइसबर्ग व्हाइट, ओशियानिक ब्लॅक व शिमरिंग सिल्व्हर