‘महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस ट्रॅक्टर’ने जिंकले,आयटीओटीवाय’चे ‘इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर २०२२’ पारितोषिक

Date:

महिंद्रा नोव्हो ७५५ डीआयने पटकावले ६० एचपीवरील श्रेणीतील सर्वोत्तम ट्रॅक्टरचे पारितोषिक

मुंबई२3 जुलै२०२२ : ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ या महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचा भाग असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादकाने प्रतिष्ठित ‘इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर २०२२’ (आयटीओटीवाय) या सोहळ्यात चार पारितोषिके पटकावली. नवी दिल्ली येथे ‘आयटीओटीवाय’चा हा तिसरा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

·         महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस ठरला ‘२०२२मधील सर्वोत्कृष्ट भारतीय ट्रॅक्टर

·         ‘महिंद्रा नोवो ७५५ डीआय ठरला ६० एचपीवरील सर्वोत्तम ट्रॅक्टर

·         भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ट्रॅक्टर उत्पादक

·         ‘महिंद्रा श्री चाइल्ड स्कॉलरशिप प्रोग्रॅम ठरला २०२२मधील सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम

महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस’ – या वर्षीचा सर्वोत्कृष्ट भारतीय ट्रॅक्टर

गेल्या वर्षी सादर झालेला ‘महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस’ हा २०२२मध्ये सर्वाधिक विकला जाणारा ट्रॅक्टर होता. ४०-५० एचपी श्रेणीतील तो सर्वात मजबूत ब्रँड आहे; महिंद्रा ट्रॅक्टर्सची ‘टफ हरदम’ ही ‘ब्रँड पोझिशनिंग’ जागविणारा हा ट्रॅक्टर आहे.

आपल्या श्रेणीतील सर्वात जणकट आणि विश्वासार्ह म्हणून ओळखला जाणारा ‘महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस’ हा ट्रॅक्टर वाहतुकीच्या कठीण क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. शेतात कापणीपूर्वी आणि कापणीनंतरही अनेक कामांसाठी तो वापरला जाऊ शकतो. कार्यप्रदर्शन आणि इंधन कार्यक्षमता यांच्या उत्कृष्ट संयोजनासाठी खास बांधणी झालेल्या ‘महिंद्रा ५७५ डीआय एक्सपी प्लस’ या ट्रॅक्टरमध्ये ३५ केडब्ल्यू (४६.९ एचपी) क्षमतेचे फोर-सिलेंडर ‘ईएलएस डीआय’ इंजिन, स्मूथ कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशन आणि १४८० किलो अॅडव्हान्स्ड हायड्रॉलिक्स २डब्ल्यूडी अशी यंत्रणा आहे. या ट्रॅक्टरवर सहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

महिंद्रा नोवो ७५५ डीआय’ – ६०एचपीवरील सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर

https://www.mahindratractor.com/images/tractor_banner/MAHINDRA-NOVO-755-DI.jpg‘महिंद्रा नोव्हो ७५५ डीआय’ हा भारतातील सर्वात शक्तिशाली तांत्रिकदृष्ट्या प्रगत ४डब्ल्यूडी ट्रॅक्टरपैकी एक आहे. विविध प्रकारच्या मातीच्या परिस्थितीसाठी आणि कृषी हंगामासाठी तो खास तयार केला गेला आहे. तो प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करतो. ५५.२ केडब्ल्यू (७४.० एचपी), २१०० आरपीएम (आर / मिनिट) फोर-सिलेंडर इंजिन, वेगाचे ३० भिन्न पर्याय अशी यंत्रणा असलेल्या या ट्रॅक्टरमध्ये अमर्याद तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत.

भारतातील सर्वात वेगाने वाढणारे ट्रॅक्टर उत्पादक – महिंद्रा ट्रॅक्टर्स

महिंद्रा ट्रॅक्टर्स हा तीन दशकांहून अधिक काळ भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. इंटरनॅशनल हार्वेस्टर इंकयूएसएयांच्या एका संयुक्त उपक्रमाद्वारे महिंद्रा अँड महिंद्राने १९६३मध्ये आपला पहिला ट्रॅक्टर बाजारात आणल्यानंतरमार्च २०१९मध्ये तीन दशलक्ष ट्रॅक्टर विकणारा हा पहिला भारतीय ट्रॅक्टर ब्रँड बनला आहे. यामध्ये कंपनीच्या जागतिक स्तरावरील विक्रीचाही समावेश होता. अत्युत्कृष्ट बांधणी आणि खडबडीत भूतलावर कामगिरी बजावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्राच्या ट्रॅक्टर्सनी कंपनीला डेमिंग अवॉर्ड आणि जपानी गुणवत्ता पदके मिळवून दिली आहेत. ही कामगिरी करणारी ही एकमेव ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी बहुपयोगी वापरासाठी विकसित करण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या सर्वात वैविध्यपूर्ण श्रेणींमध्ये या ट्रॅक्टर्सची गणना होते.

महिंद्राची सहा खंडांतील ५० हून अधिक देशांमध्ये उपस्थिती असून कंपनीसाठी भारताबाहेरील बाजारपेठांमध्ये अमेरिकेची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. आज जगभरात महिंद्राचे उत्पादन व असेंबली होते. आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज उत्तर अमेरिकाब्राझीलमेक्सिकोफिनलंडतुर्की आणि जपान या देशांमध्ये सुरू आहे. भारतात मुंबईनागपूररुद्रपूरजयपूर आणि जहीराबाद येथे महिंद्राचे कारखाने आहेत.

महिंद्रा श्री – सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम

महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरच्या ट्रान्सफॉर्म फार्मिंग आणि समृद्ध जीवनाच्या ब्रँड वचनावर आधारित, महिंद्रा श्री‘ हा कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण भारतातील शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात १०वी व १२वीची बोर्डाची परीक्षा दिली आहेत्यांच्यासाठी ही योजना आहे. सुमारे दोन लाख शेतकऱ्यांचा सहभाग असलेला महिंद्रा श्री हा उपक्रम शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन उन्नत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्सने २०२२मध्ये संपूर्ण भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्‍यांच्या १ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्सने या संदर्भात युनायटेड वेज इंडिया’ या एनजीओशी हातमिळवणी केली असून ही संस्था जागतिक युनायटेड वे नेटवर्कशी संलग्न आहे.

ट्रॅक्टर जंक्शनने २०१९मध्ये आयटीओटीवाय हा प्लॅटफॉर्म सुरू केला. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर बाजारपेठेतील ट्रॅक्टर व शेती उपकरणे उत्पादकांच्या कठोर परिश्रमांना आणि प्रयत्नांना न्याय देणारे हे एक व्यासपीठ आहे. आयटीओटीवाय पारितोषिकांची निवड ज्युरी सदस्यांद्वारे केली जातो. या ज्युरींमध्ये देशभरातील शेती उपकरणे तज्ज्ञ सहभागी असतात. ते निष्पक्ष मतदानानंतर सर्वात योग्य स्पर्धक निवडतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...