पुणे-
युद्ध नाही ,संवाद हाच उपाय :स्वामी अग्निवेश -‘गांधी सप्ताहाचा ‘ कोथरूड मध्ये समारोप
‘ युद्ध नाही ,संवाद हाच उपाय आहे ,संविधानात संवादाचे महत्व अधिक ‘ असल्याचे प्रतिपादन आज स्वामी अग्निवेश यांनी केले ‘.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ आयोजित ‘गांधी सप्ताह ‘ या उपक्रमाचा समारोप करताना प्रश्नोत्तरात ते बोलत होते . अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ . कुमार सप्तर्षीं हे होते . हा कार्यक्रम गांधी भवन येथे झाला .
‘ शस्रास्त्र स्पर्धा न करता ,शस्त्र सामग्री उत्पादक देशांना बळी न पडता ,युद्ध साहित्यावर चा खर्च गरिबांच्या विकासासाठी उपयोगात आणणे आवश्यक असल्याने युद्ध त्याज्य मानावे ‘ असा विचार स्वामी अग्निवेश यांनी मांडला .
ते म्हणाले ,’ युद्ध कधीही योग्य असू शकत नाही . जगात भस्मासुर निर्माण करणाऱ्यांना त्रास झालेला आहे . शस्त्रात्रांच्या खरेदीवर खर्च होणारी रक्कम ५ टक्के कमी केली तरी जगातील गरिबांची उन्नती शक्य आहे . . २१ व्या शतकात युद्ध नाही ,तर मनापासून साधलेला संवाद यापेक्षा दुसरा मार्ग नाही . ‘
एकमेकांशी युद्ध करू पाहणारे भारत -पाकिस्तान देश हे अमेरिकेकडूनच शस्त्रास्त्र खरेदी करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले . दहशतवाद्यांना कोण निर्माण करते याकडेही लक्ष देण्याची गरज आहे .
प्रश्नोत्तराआधी आधी भाषणात बोलताना स्वामी अग्निवेश म्हणाले ,’डॉ . कुमार सप्तर्षी हे गांधीजींची विचारधारा ,परंपरा पुढे नेण्याचे काम प्रामाणिक पणे करीत आहेत . आम्ही जनता पक्षात एकत्र काम केले आहे . पुणे ही ऐतिहासिक नगरी आहे . पण ,येथेही असहिष्णुता वाढत आहे . देशात डॉ . दाभोळकर ,गोविंद पानसरे ,डॉ कलबुर्गी यांच्या हत्या होत आहेत . भांडारकर सारख्या संस्थेवर हल्ले होत आहेत . अशा वेळी ‘गोली से नही ,बोली से ‘ प्रगतीचा मार्ग दिसेल हे लक्षात ठेवले पाहिजे .
किमान समान कार्यक्रम ‘ घेऊन सर्वानी पुढे आले पाहिजे त्यात जातीवाद मुक्त समाज ,अस्पृश्यता मुक्ती ,स्त्री -पुरुष समानता ,अंध श्रद्धा निर्मूलन ,वेठबिगारी -बालमजुरी मुक्ती ,भूक मुक्ती ,भ्रष्टाचार आणि शोषण मुक्त समाज ,पशु हत्या मुक्त समाज ,घडविन्याची गरज आहे .
डॉ कुमार सप्तर्षी यांनी जिल्ह्या -जिल्ह्यात आंतर जातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे ‘अभिनंदन संमेलन ‘ घ्यावे अशी सूचनाही त्यांनी केली . ज्यांना आरक्षणाचे फायदे अनेकदा मिळाले त्यातील किमान २५ जणांनी ‘मला आरक्षण नको ‘ असे सांगायला पुढे आले पाहिजे,असे मतही त्यांनी व्यक्त केले .
महापौर प्रशांत जगताप म्हणाले ,’गांधीजींचा विचार हा पुढील पिढयांना आशेचा किरण आहे . गांधी सप्ताह ‘च्या निमित्ताने नवी पिढी आस्थेने या विचाराभोवती जमते आहे ,हे चित्र आनंददायक आहे . समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे प्रयत्न होत असताना ही आस्था उपयोगी ठरेल ‘. डॉ . कुमार सप्तर्षी यांनी समारोप केला
संदीप बर्वे यांनी सूत्र संचालन केले . अप्पा अनारसे यांनी आभार मानले
व्यासपीठावर अन्वर राजन उपस्थित होते . सभागृहात डॉ उर्मिला सप्तर्षी ,मिलिंद वालवडकर,तोडणकर गुरुजी ,अंजली सोमण उपस्थित होते