पुणे- महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीमाई फुलेंनी ज्या भूमीतून सामाजिक सुधारणांची ज्योत प्रज्वलित केली. त्या पुण्याच्या महापालिकेतील महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यासाठी आता कोणालाही शिडी लावून आडवे तिडवे उभे राहून सर्कस करण्याची गरज भासणार नाही . आता यासाठी इथे बसविण्यात आली आहे हायड्रोलिक लिफ्ट … पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिकेच्या आवारातील गार्डन सदाबहार ठेवण्याच्या साठी आपल्या उपमहापौर पदाच्या कारकिर्दीत या साठी राबविलेली योजना आता पूर्णत्वास येत आहे . महात्मा फुलेंचा पुतळा सदातेजोमय ठेवणे याशिवाय त्यास हार घालण्यासाठी लिफ्ट अशा बाबींसह , पुण्यचे पहिले महापौर आणि पहिले आयुक्त यांचा अर्ध पुतळा दोन बाजूस उभारणे , बगीचा सुशोभित करणे अशा कामांचा त्यात समावेश आहे . पहा याबाबत प्रत्यक्षातील कामाची स्थिती आणि स्वतः आबा बागुल यांनी दिलेली माहिती ची अल्प व्हिडीओझलक ..