महाशिवरात्र: सुनेत्रा अजित पवार यांनी साकारली तब्बल ५१ किलो चक्क्याची पिंड

Date:

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्या दर्शनाकरिता आल्या होत्या. ट्रस्टतर्फे तब्बल ५१ किलो चक्क्याची पिंड साकारण्यात येत असताना पवार यांनी त्यामध्ये सहभाग घेत आपली सेवा देखील रुजू केली. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, अ‍ॅड.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, अ‍ॅड.रजनी उकरंडे, युवराज गाडवे, अ‍ॅड.प्रताप परदेशी, अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून सुमारे दहा मिनिटे चक्केश्वर महादेव साकारण्यात सहभाग घेत महाराजांच्या चरणी सेवा अर्पण केली. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरिता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. तीन तासात सुमारे ५१ किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली असून त्यामध्ये द्राक्षे, विविध फळे, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, बेल, विविध फुले वापरुन पिंडीवर आकर्षक सजावट करण्यात आली. नंतर चक्क्याचा प्रसाद तयार करुन मंदिरात व सामाजिक संस्थाना वाटप करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

प्रमोद भगवान, लता भगवान, लीना भागवत यांनी शंकराचा मुखवटा आणि मंदिरातील सेवक व पुजारी पुरुषोत्तम वैद्य, उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, चंद्रकांत कासार, लक्ष्मीबाई पत्की, प्रभावती नांगरे, वैभव निलाखे, ॠषिकेश अभंग, सोमनाथ स्वामी यांनी संपूर्ण पिंड व सजावट तीन तासात साकारली. दत्तभक्त योगेश गोसावी व सोनाली गोसावी यांनी अभिषेक करण्यासाठी दत्तमहाराजांची दीड किलो चांदीची मूर्ती अर्पण केली. गोसावी परिवार यांच्या हस्ते सहकुटुंब माध्यान्य आरती झाली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...