पुणे;-इसिसची चळवळ जसा वेडेपणा आहे,तसाच १० मुले जन्माला घाला असे सांगणे,हा वेडेपणा आहे. इसिस रोखणे आवश्यक आहे,तसेच यांनाही रोखणे आवश्यक आहे. १० मुले जन्माला घाला
परमेश्वर त्यांच्या संगोपनाची काळजी घेईल,असे सांगणे चुकीचे आहे’,असे उद्गार महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’
चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी काढले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार-२०१६’ आणि ‘पी.ए.इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्कार-२०१६’ च्या वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,
जगात अनेक देशात एकच धर्मपद्धती असतात. भारत हा एकच देश असा आहे,
ज्यात १२ धर्मांचे अनुयायी राहतात. इतक्या धर्मांसह आपण काळाच्या कसोटीवर टिकलो आहोत.
भारत हा १२ धर्म एकत्र नांदणारा देश असल्याने आपल्याला १२ धर्मांचा गोडवा घेण्याची संधी आहे. ती संधी नाकारणे आणि धर्माच्या नावाने दंगल एकमेकांना भडकविणे थांबले पाहिजे तरच दंगामुक्त समाज घडेल, भारत घडेल.
इसिसची चळवळ जसा वेडेपणा आहे,तसाच १० मुले जन्माला घाला असे सांगणे,
हा वेडेपणा आहे. इसिस रोखणे आवश्यक आहे,तसेच यांनाही रोखणे आवश्यक आहे. १० मुले जन्माला घाला,
परमेश्वर त्यांच्या संगोपनाची काळजी घेईल,असे सांगणे चुकीचे आहे.’
‘अल्पसंख्य समाजातील मुलींना शिक्षणाची दारे उघडण्याचे पी ए इनामदार यांचे कार्य अतुलनीय आहे. मुलींना शिकवणे हे परमेश्वराचे काम करण्यासारखेच आहे आणि पुण्यात या कामाला तोड नाही’
असे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.
यावर्षी डॉ.सतीश देसाई,हेरंब कुलकर्णी (ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक),संजय पवार (नाटककार आणि ज्येष्ठ लेखक)बाबा शिंदे (जेजुरी जवळील ‘पिंगोरी’ गावाचा चेहरा
जलसंधारणाच्या माध्यमातून बदलणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार)यांना पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आले.तसचे डॉ.आर.गणेस(अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक) आणि सईद ए.मौलवी(एम.सी.ई.सोसायटीचे लेखापाल)यांना पी.ए.इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले.हेरंब कुलकर्णी यांच्या वतीने राजेंद्र धारणकर यांनी सन्मान स्वीकारला.
डॉ. सतीश देसाई म्हणाले,’ज्या डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या दवाखान्याची जागेत मी वैद्यकीय सेवेबरोबर समाजेवेचे काम सुरु केले,त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे,हा मोठा योग आहे.’
संजय पवार म्हणाले,रोज कशावर तरी बंदी येत आहे.कॉस्मोपॉलिटन हा शब्द पुसण्याचे काम चालू आहे.अशा वेळी एकाने सांगून सव्वाशे कोटी जनतेने ऐकण्यापेक्षा सव्वाशे कोटी जनतेचे एकाने ऐकण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी केले. सूत्रसंचालन रूमाना शेख यांनी केले तर एम.सी.ई.सोसायटीचे सचिव लतिफ मगदूम यांनी आभार मानले.
यावेळी माजी सहायक पोलीस महासंचालक अशोक धिवरे,
सुरेश(काका) धर्मावत,डॉ.उर्मिला सप्तर्षी,संदीप बर्वे,गौरी बीडकर इत्यादी उपस्थित होते.