इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमध्ये १८ ते ३० मार्च २०१९ पर्यंत मोफत तपासणी शिबिर

Date:

सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा

पुणे – पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. ह्या गभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. १८ ते ३०मार्च २०१९ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०%- ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्र ह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ.हृषीकेश देशमुख  यांनी व्यक्त केले.

प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक

टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान

करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे

ज्यात १३० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातुन  ७०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.

आयपीसी पुणेच्या अध्यक्षा डॉ. गरिमा माहेश्वरी म्हणतात की निश्चित चाचणीसाठी एकमात्र उपाय म्हणजे प्रोस्टेट बायोप्सी जी सोपी आहे परंतु ती व्यवस्थित पद्धत्तीने अल्ट्रासाऊंडच्या देखरेखीखाली व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे.

प्राथमिक लक्षणे:

  • वारंवारलघवीयेणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे
  • कॅन्सरच्यापूढीलटप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभवतो.

भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५०  वर्षेवयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या  पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.

तारीख : १८  ते  ३० मार्च, २०१९

वेळ – अपॉईंटमेंट नुसार

ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर,  पुणे ग्राउंड फ्लोअर, कुमार – दि ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेन्टरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे

संपर्क :०२०-६६०३७७७७-७८

मोबाईल नंबर-७७९८५७७५६३

इमेल आयडी:    Front.Office@ipcpune.com  

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...