राजा परांजपे प्रोडक्शनचा नविन अभ्यासक्रम, थिएटर मास्टर्स, ७ सप्टेंबर पासून
पुणे- अभिव्यक्ती हा मनुष्याचा एक मुख्य गुण आहे. सशक्त अभिव्यक्ती कलेद्वारे आपण आपले विचार अधिक प्रभावी आणि सक्षमतेने समोरच्यापर्यंत पोहचवु शकतो, याचबरोबर योग्य ज्ञानच्या जोरावर मोठ्या समस्यांचे निराकरण करता येते. अशीच सशक्त अभिव्यक्ती शिकवणारा राजा परांजपे प्रोडक्शनचा नविन अभ्यासक्रम, थिएटर मास्टर्स ७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. ‘थिएटर मास्टर्स’ लहान मुलांबरोबर प्रौढांसाठीही आहे.
गेल्या काही शतकांपासून थिएटर हे एक असे व्यासपीठ आहे जेथे अभिव्यक्ती आणि संबंधित अन्य बाबींचे ज्ञान मिळते. याचबरोबर प्रभावीपणे स्वतः व्यक्त करण्यास शिकवले जाते. जरी आपली शिक्षण प्रणाली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यावर जोर देते, पण त्यांच्यामुळे कलांचे महत्व नाकारता येत नाही. रंगमंच आपली सर्जनशीलता वाढविण्यात देखील मदत करतो, म्हणून थिएटर सारखे व्यासपीठ खुप आवश्यक आहे.
राजा परांजपे प्रोडक्शनद्वारा आयोजित ‘थिएटर मास्टर्स’ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे आपण अभिव्यक्तीची कला अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतो. याबरोबरच, थिएटरच्या विविध प्रकारांशी देखील अवगत होता येते, जसे रेडियो प्ले, स्ट्रीट प्ले. येथे नाटकाच्या विकसनशील कला देखील शिकवल्या जातील ज्या थिएटर जगात अतिशय महत्वपुर्ण आहेत. याव्यतिरिक्त मुलांमधली रंगमंचाची भीती देखील कमी होईल जेणेकरून मुले त्यांचा आत्मविश्वासात आणि संवाद कौशल्यांमध्ये सुधारणा करू शकतील.
‘थिएटर मास्टर्स’ अभ्यासक्रम सप्टेंबरमध्ये सुरू होईल; मुलांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळा वेळ असेल.
मुलांसाठी-
इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या मुलांसाठी शनिवार, सकाळी ६.३० – ते दुपारी १ पर्यांत
प्रौढांसाठी-
आठवड्यातील ३ दिवस(शुक्रवार, शनिवार, रविवार), वेळ – सायंकाळी ६.३० ते ९.००
अधिक माहितीसाठी संपर्क – ८३०८३०८६८६/८९७५३०८६८६