पुणे-“बेलीस्मा” हा “बेली डान्सिंग” आणि “चेरिश्माचा एकत्रीकरण दर्शविणार्या नृत्यप्रकाराची नवीन संकल्पना आहे. रागा इव्हॉल्यूशन फॅल्श मोब बेली डान्सिंगची म्हणजेच बेलीस्मा या वर्षी अमनोरा मॉल येथे होणार आहे. शनिवार १ सप्टेंबर रोजी अमनोरा मॉल, पूर्व ब्लॉक, आर्ट्रिअम मध्ये हे सादरीकरण होणार आहे .
अझिझ देग्वेकर यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या या नृत्य-प्रकाराचा उद्येश्य आहे स्त्रियांची उन्नती आणि बेली डान्सिग संस्कृतीचा प्रसार करणे. २०१४ मध्ये ४० मुलींना घेऊन सुरु झालेल्या या बेली डांसीग फॅल्श मोब मध्ये आज १६० मुलींचा समावेश आहे. अनोख्या अश्या या नवीन नृत्यप्रकाराचा अविष्कार यावेळी पाहता येईल असा दावा संयोजकांनी केला आहे .





