पुणे : भारतातील आघाडीची ऑफसाइट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनीफॅक्चरिंग कंपनी केइएफ इन्फ्राने अमेरिकेतील डिझाईन आणि कन्सट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कटेरा या टेक्नोलॉजी कंपनीसोबतच्या व्यापार विस्ताराची नुकतीच घोषणा केली. ह्यात दोनही कंपनीच्या उत्पादन क्षमतेला याचा प्रचंड फायदा होईल. सध्या नॉर्थ अमेरिका आणि भारतात ३.७ बिलियन डॉलर्सचे बुकिंग कटेरा कंपनीचे आहे.
या व्यावसायिक भागीदारीमुळे मी अत्यंत आनंदी असून सारखी विचारधारा असलेल्या टीमसोबत काम करताना भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. अशी भावना ह्यावेळी केइएफ इन्फ्राचे संस्थापक आणि अध्यक्ष फैजल कोट्टीकॉलोन यांनी व्यक्त केली.
सम विचारधारेलाच पुढे नेताना कटेरा कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक मायकल मार्क्स म्हणाले केइएफ इन्फ्रासारख्या कंपनीशी जुळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमची मुल्ये, तत्वे आणि दृष्टीशी इतकी जवळ येणारी टीम आम्हाला मिळणे हे आमचे भाग्य आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मार्क्स असून कटेरा कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत आहे, कटेराचे जगभरात 2 कारखाने आणि 2,000 कर्मचारी आहेत. युएसडी 1.1 डॉलर्सचे टर्नओव्हर आहे. कटेराच्या गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्टबँक, फॉक्सकॉन आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इनव्हेस्टमेंट बोर्ड यांचा समावेश आहे.