मंजूषा मुलिक बनल्या मिसेस महाराष्ट्र २०१७
पुणे,- मिसेस महाराष्ट्र २०१७, सिजन २ ही सौंदर्यस्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहत पार पडली. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेल्या गूण हे निकष लक्षात घेऊन या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर मंजूषा मुलिक यांनी मिसेस महाराष्ट्र २०१७ चा किताब पटकवला. या सौंदर्य स्पर्धेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रीत २५० सौंदर्यवतींनी भाग घेतला होता, ज्यामध्ये २० स्पर्धक अंतीम फेरीमध्ये पोहचल्या ज्यामध्ये मंजूषा मुलिक यांना मिसेस महाराष्ट्र ही उपाधी मिळाली .
याचबरोबर इचलकरंजीच्या सौम्या पवार फस्ट रनर अाणि पीसीएमसीच्या अंजली चिंचवाडे सेंकड रनर अप बनल्या. महापौर मुक्ता टिळक ह्यावेळी मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी रेशमा सराफ यांनी कपडे डिजाईन केले होते आणि मेकअप सिम्ज यूनीसेक्स सलॅनचा होता.
ह्यावेळी आपले विचार व्यक्त करताना मंजूषा मुलिक म्हणाल्या कि “मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे, माझे पालक, बहिण, मित्र आणि शुभचिंतकांच्या बिनशर्त प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते.”
या खास सौंदर्यस्पर्धाच्या परिक्षक म्हणुन मिसेस इंडिया इंटरनॅशनल ग्रूमर हेमा कोतनिस,लाइफस्टाइल मॅगझिनच्या निशरीन पूनवाला, मिसेस एशिया प्रियंका पोल, मिसेस इंडिया इंटरनॅशनल स्नेहा प्रहलादका उपस्थित होत्या. जॅझमाटाझ वर्ल्ड गत २५ वर्षांपासून ह्याचे प्रायोजक आहेत.