६०० शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत पार पडला अर्ली चाइल्डहुड एडुफेस्ट
पुणे-
६०० एज्यूकेशनिस्ट, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थित नुकताच अर्ली चाइल्डहुड एडुफेस्ट २०१७ पार पडला, ह्यावेळी बालविकास आणि लहान मुलांच्या विकासासाठी आवश्यक विकसित शिक्षणपद्धत्ती आणि बदलांवर चर्चा झाली.संशोधनाद्वारे दिसून आले आहे की बालपणातील सुरवातीची काही वर्ष मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. आपल्या भवतीचे जग अत्यंत जलद गतीने बदलत आहे. त्यानुसार वर्तमान आणि भविष्यास अनुरूप असे बदल शिक्षणातही होणे आवश्यक आहे. समाजाला आज अश्या प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे.
लहान मुलांची देखभाल आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांचा अनुभव व कौशल्य उपस्थितांशी शेअर कारण्यासाठी द अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन त्यांना एका व्यासपीठावर आणले. अर्ली चाइल्डहुड अससोसिएशन, पुणे चॅप्टरने ‘पीस- पुणे इंटरनॅशनल अर्ली चाइल्डहुड अजुफेस्ट’ ह्या एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले होते.
मुलांमध्ये भावनिक विकास होऊन पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे जेणेकरून ते भविष्यात जबाबदार नागरिक बनु शकतील. अर्ली चाइल्डहुड एजुकेशन चिरस्थायी विकासासाठी अशा शिक्षाणाचा पाया रचत आहे.
यावेळी मदर गूज टाईम, युएसए-श्रीमती लेसली फॅल्कोनर यांनी अध्यापन आणि मूल्यमापनातील ‘डिझाइन थिंकिंग’ या विषयावर चर्चा केली. अर्ली चाइल्डहुड एजुकेशनच्या अध्यक्षा स्वाती पोपट वत्स प्री-स्कुल एजुकेशनच्या जागतिक प्रथेविषयी बोलल्या. लेखीका उद्योजक आणि वक्ता प्राची जावडेकर यांनी ह्या वेळी आपले विचार व्यक्त केले त्या म्हणाल्या कि, मुलांचा सर्वांगिण विकस महत्वाचा असतो, परीक्षेचे किती मार्क मिळाले हे महत्वाचे नसते.