४० टक्के डॉक्टरांच्या ऑनलाईन बुकींग कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराच्या आरोग्य तपासणीसाठी राखीव: मेडीबडीच्या ऑनलाईन डेटाची माहिती
सायंकाळी सहानंतर ऑनलाईन डॉक्टर सल्लामसलतकरिता ३७ टक्के बुकींग होत असल्याचे मेडिबडीच्या अभ्यासाअंती उघडकीस आले. ही वेळ रुग्णांना जास्त सोयीस्कर असल्याचेही यात नमूद करण्यात आले. दिवसरात्र ऑनलाईन डॉक्टरांशी सल्लमसलत करत चांगली वैद्यकीय सुविधेची मागणी वाढत असल्याचेही यातून निष्पन्न झाले.
पुणे –डिजीटल माध्यमातून देशभरात सर्वात मोठी आरोग्यसेवा पुरवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या मेडिबडी कंपनीने गेल्या वर्षी आगळावेगळा विक्रम रचला. २०२४ साली मेडिबडीच्या ऑनलाईन डॉक्टर सल्लामसलत सेवेचा तब्बल १.२७ कोटी भारतीयांनी लाभ घेतला. यातून देशातील असंख्य रुग्ण आता ऑनलाईन आरोग्यसेवेचा लाभ घेण्याला पसंती दर्शवत असल्याचेही सिद्ध झाले. मेडिबडीने या डेटाच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारतीयांमध्ये आरोग्याविषयक वाढती जागरुकता तसेच बदलत्या आरोग्य व्यवस्थेबद्दल आश्चर्यकारक माहिती उपलब्ध झाली.
प्रत्येक भारतीय कुटुंबीयांमध्ये आपापल्या घरातील सदस्यांच्या आरोग्याविषयक काळजीबाबतचा महत्त्वाचा पैलू या डेटाच्या माध्यमातून उघडकीस आला. गेल्या वर्षभरात तब्बल ४० टक्के ऑनलाईन डॉक्टरांशी होणा-या सल्लामसलत बुकींग या संबंधितांना स्वतःच्याऐवजी आपल्या कुटुंबीयांतील सदस्य तसेच मित्रपरिवारासाठी केल्याची आश्यर्यकारक माहिती या डेटातून समोर आली. ऑनलाईन माध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन आपल्या आप्तेष्ठांची काळजी घेण्याचा नवा ट्रेण्ड यानिमित्ताने दिसून आला. ४० टक्के बुकिंगपैकी ४४ टक्के बुकिंग या पालकांसाठी राखीव केल्या गेल्या. ऑनलाईन विश्वात रमलेल्या तरुणाईला या माध्यमाचा सुयोग्य वापर करत आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यातील आत्मीयता यातून स्पष्ट झाली. आपल्या जोडीदारासाठी ३३ टक्के बुकिंग नोंदवल्या गेल्या. आपल्या लहान मुलांसाठी ११ टक्के बुकिंगची नोंद झाली .
आरोग्याविषयक लोकांमध्ये सतर्कता बाळगली जात असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण गेल्यावर्षी दिसून आले. सायंकाळी सहानंतर ३७ टक्के बुकिंग केल्या जात होत्या. चांगल्या दर्ज्याच्या आरोग्यसुविधा दिवसरात्र उपलब्ध असाव्यात, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कार्यालयीन वेळा सांभाळत आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता ऑनलाईन आरोग्यसेवेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी ब-यापैकी प्राधान्य दिले जात असल्याचे मेडिबडीच्या डेटातून स्पष्ट झाले.
आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्याबदद्ल माहिती मिळावी म्हणून या ऑनलाईन माध्यमावर सर्वात जास्त बुकिंग पोटविकारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि त्वचाविकारतज्ज्ञांच्या झाल्या. पचनक्रिया हा उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. पचनक्रियेतील बिघाड झाल्यास अनेकांनी तातडीने पोटविकारतज्ज्ञांनी मदत घेतली. यातून लोकांमध्ये पोटाशी संबंधित आजारांबद्दल ब-यापैकी जनजागृती झाल्याचे मेडिबडीच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधला जावा, त्यांच्या आरोग्याची जपणूक करण्याबद्दल अनेक पालकांना उत्सुकता होती. आपल्या त्वचेची काळजी घेणे हे आता सर्वांसाठी प्राधान्यक्रमाचे झाल्याचेही ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून समोर आले. ब-याचजणांनी आपल्या चेह-यावरील पुटकुळ्या तसेच इतर त्वचाविकारांवर ऑनलाईन उपचार घेण्यास पसंती दर्शवली.
डिजीटल माध्यमांचा सर्वतोपरी वापर केल्याने आता रुग्णांचा रिपोर्टही डिजीटल स्वरुपात नोंदवला जात आहे. तब्बल १ हजार १९५ झाडांची कत्तल रोखता आली. या झाडांच्या मदतीने वातावरणातील ३० हजार किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करता आले. मेडिबडीकडून या नव्या शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्याच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. ऑनलाईन स्वरुपातील मदतीमुळे आता पर्यावरणाचा -हास कमी होत चालला आहे. इंधनाच्या जाळण्यातून वातावरणात तब्बल २.७५ दशलक्ष कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आता बंद झाले आहे. केवळ रुग्णाचेच आरोग्य नव्हे तर पर्यावरणाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आता डिजीटलचा पर्याय उपयोगी ठरला.
गेल्या वर्षी मेडिबडीच्या पॅथालॉजिस्टकडून रक्तसंकलनाची घरगुती सेवा देण्यासाठी तब्बल ८० लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवासाचा टप्पा पार पडला. हे अंतर काश्मीर ते कन्याकुमारीच्या एकूण अंतराचा विचार केल्यास २ हजार १९२ वेळा पार केले गेले. रक्त संकलनासाठी तब्बल २५ टक्के महिला पॅथालॉजिस्टनी पुढाकार घेतला. यातून महिला सक्षमीकरणाचेही ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले. मेडिबडीच्या सर्वोत्तम आरोग्यसेवेची वचनबद्धता राखण्यात या महिलांनी मोलाची भूमिका बजावली.
वरील माहितीच्या आधारे भारतीय आता आपल्या आरोग्याच्या हिताबाबत सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे संपूर्ण डेटा तपासणीच्या अंती दिसून आले. आरोग्याची माहिती मिळावी म्हणून सहज उपलब्ध होणारे माध्यम वापरण्याचा कल वाढत असून, त्यातून पर्यावरणाची निगा राखण्यावरही पुढाकार घेतला जात आहे, असे मेडिबडीकडून सांगण्यात आले. लोकांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सांभाळत डिजीटल माध्यमांना आरोग्यतपासणीसाठी पसंती दिली. मेडिबडी उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे. या डेटातून माणसाच्या वैयक्तिक निवडीतून सामूहिक तसेच सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो याबद्दल तपशीलवार माहिती मिळाली. माणसाचे स्वतःचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन ऑनलाईन जगतातून शक्य झाल्याचेही दिसून आले.