सितारों के आगे जहां और भी हैं… संसदेत या ओळी वाचणारे करणारे डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या अखेरच्या प्रवासाला निघाले आहेत.
आजी-आजोबांनी वाढवले, कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला:मनमोहन सिंग पाकिस्तानातून विस्थापित झाल्यानंतर हल्द्वानीला आले होते. लहानपणीच आई वारली. आजी-आजोबांनी वाढवले. गावात कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांनी प्री-मेडिकल कोर्सला प्रवेश घेतला. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी अभ्यासक्रम सोडला.
उर्दूमध्ये भाषणाच्या स्क्रिप्ट लिहून घ्यायचे
मनमोहन सिंग यांचे सुरुवातीचे शिक्षण उर्दूमध्ये झाले. पंतप्रधान असतानाही ते उर्दूमध्येच भाषणाच्या स्क्रिप्ट लिहून घ्यायचे. गुरुमुखीमध्येही अनेक वेळा लेखन केले.1948 मध्ये मॅट्रिक झाले. केंब्रिज आणि ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात केली. 1971 मध्ये ते वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले.1985 ते 1987 पर्यंत ते नियोजन आयोगाचे प्रमुख होते आणि 1982 ते 1985 पर्यंत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. पीव्ही नरसिंह राव यांनी 1991 मध्ये त्यांना अर्थमंत्री केले. 2018 मध्ये काँग्रेसने राज्यसभेत पोहोचवले. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपला.
हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी… 27 ऑगस्ट 2012 रोजी संसदेच्या संकुलात ही कविता वाचणारे मनमोहन कायमचे नि:शब्द झाले. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉ. मनमोहन सिंग यांनी 26 डिसेंबर रोजी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.
नेहमी आकाशी निळा पगडी घालणारे मनमोहन यांनी 22 मे 2004 रोजी भारताचे 14 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर असे संबोधण्यात आले, पण मनमोहन यांनी केवळ 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही तर पुढच्या वेळीही सरकारमध्ये परतले.प्रगल्भ अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग राजकारणी बनले तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक न पाहिलेले पैलू समोर आले. व्होटच्या बदल्यात नोटचा मुद्दा लोकसभेत चर्चिला जात होता. विरोधकांच्या प्रश्नांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उत्तर देत होते.
यादरम्यान विरोधी पक्षनेत्या सुषमा यांनी त्यांच्यावर टीका करत म्हटले होते- तू इधर उधर की न बात कर, ये बता के कारवां क्यों लुटा; मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है।
यावर प्रत्युत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले होते – ‘माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार तो देख।’
मनमोहन सिंग यांच्या या उत्तरावर सत्ताधारी पक्षाने बराच वेळ टेबल थोपटले, तर विरोधक गप्प राहिले.संसदेचे अधिवेशन चालू होते. मनमोहन सरकारवर कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की, कोळसा खाण वाटपाबाबत कॅगच्या अहवालात करण्यात आलेले अनियमिततेचे आरोप वस्तुस्थितीवर आधारित नाहीत आणि पूर्णपणे निराधार आहेत.
लोकसभेत निवेदन दिल्यानंतर त्यांनी संसद भवनाबाहेर माध्यमांनाही निवेदन दिले. त्यांच्या ‘मौना’वर टोमणा मारणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी ‘हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी’… हा शेर म्हणून दाखवला.
2010 मध्ये टोरंटोमध्ये जी-20 शिखर परिषद झाली. यामध्ये ओबामा यांनी द्विपक्षीय बैठकीपूर्वी मनमोहन सिंग यांचे कौतुक केले होते. ओबामा म्हणाले होते- मी तुम्हाला सांगू शकतो की येथे जी-20 मध्ये पंतप्रधान बोलतात तेव्हा लोक ऐकतात. कारण त्यांना आर्थिक प्रश्नांची सखोल माहिती आहे. जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाची गुंतागुंत जाणून आहेत.
यानंतर 27 सप्टेंबर 2013 रोजी मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भेट झाली. याबाबत बराक ओबामा म्हणाले होते – पंतप्रधान सिंग हे सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट भागीदार आहेत.
जेव्हा बराक ओबामा यांनी त्यांच्या राजकीय प्रवासावर ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक लिहिले तेव्हा त्यात त्यांनी नोव्हेंबर 2010 मध्ये आपल्या भारत भेटीचा 1400 शब्दांत उल्लेख केला होता. या काळात मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते.
ओबामा यांनी लिहिले होते – मनमोहन सिंग हे एक वयस्कर शीख नेते होते, ज्यांना राष्ट्रीय राजकीय आधार नव्हता. अशा नेत्याकडून सोनियांना त्यांचा 40 वर्षांचा मुलगा राहुलला कोणताही राजकीय धोका दिसला नाही, कारण त्यावेळी त्या त्यांना मोठ्या भूमिकेसाठी तयार करत होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएच्या पराभवानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून शेवटच्या वेळी देशाला संबोधित केले. ते म्हणाले- मला जे काही मिळालं आहे, ते या देशाकडूनच मिळालंय…
आपल्या भाषणात ते म्हणाले- 10 वर्षांपूर्वी ही जबाबदारी स्वीकारताना मी पूर्ण मेहनत घेऊन सत्याच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला होता. आज, जेव्हा पायउतार होण्याची वेळ आली आहे, तेव्हा मला जाणवते की देवाच्या अंतिम निर्णयापूर्वी, सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या कार्याचा न्याय जनमत न्यायालयाद्वारे केला जातो.
मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे माझे सार्वजनिक जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मी नेहमी माझ्या क्षमतेनुसार आपल्या महान राष्ट्राची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानपद सोडल्यानंतरही तुमच्या प्रेमाच्या आणि आपुलकीच्या आठवणी माझ्या मनात ताज्या राहतील. मला जे काही मिळाले आहे, ते मला या देशाकडूनच मिळाले आहे.
एक असा देश ज्याने फाळणीनंतर एका बेघर मुलाला एवढ्या मोठ्यावर पदावर नेले. हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. हादेखील एक सन्मान आहे ज्याचा मला सदैव अभिमान वाटेल.

