कात्रज: गुजर निंबाळकरवाडी मधील सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ग्रामीण जीवनाचे दर्शन. ‘सरहद एक गाव’ या संकल्पनेचे आयोजन केले होते.
या मागचा मुख्य उद्देश मुलांना लोप पावत चाललेली संस्कृती, व ग्रामीण जीवन यांचे शहरात दर्शन व्हावे. शिक्षकांच्या मदतीने मुलांनी बैलगाडीची सफर केली . शेती लागवड, शेतखळे, मळणी, उफणणी, तालीम, गावातील घरे, नदी घाट त्यावर कपडे धुणाऱ्या महिला त्यांचा संवाद, जात्यावरील दळण, उखळातील कांडणे, ताक घुसळणे, गोधडी शिवणे, बारा बलुतेदार, प्रत्यक्षदर्शी चुलीवरील स्वयंपाक. आठवडे बाजार, शेळीपालन , कोंबडी पालन, बाल संगोपन, मंदिर शाळा, दवाखाना ग्रामपंचायत, चावडी, वाचनालय, इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला होता. हे जीवन मुलांनी पाहिले नाही तर प्रत्यक्ष अनुभवले प्रत्येक कृती ही मुलांनी जिवंत साकारली. चुलीवर रांधलेल्या स्वयंपाका चाआस्वाद निसर्गाच्या सानिध्यात भारतीय बैठकीत मुलांनी घेतला. सायंकाळी शेकोटी करून मुलांनी विविध प्रकारे कलागुण सादर केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिवा सुषमा नहार . प्रमुख अतिथी नम्रताताई नमेश बाबर तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख. शाळेच्या विभाग प्रमुख मनीषा वाडेकर . प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे. व सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामीण रांगड्या बोलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. शशिकला रांजणे व निशा कडते यांनी केले. मुलांनी सर्व प्रात्यक्षिके स्वतः केली. शेतकाळ्यातील मळणी शेती व चुलीवरचा स्वयंपाक असे पारंपारिक वेशभूषेतील सादरीकरणाचे . प्रमुख अतिथींनी कौतुक केले. व शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे ग्रामीण जीवन त्यातील मधाळ गाभा आहे. हा जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून सरहद ग्लोबल स्कूल करते आहे . याचे सर्व अतिथींना कौतुक वाटले. सर्व अतिथींच्या मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली.