Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

*केएसबी लिमिटेडच्या कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या स्टॉल्सना किसान प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद

Date:

पुणे : मोशी येथे 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या ,किसान प्रदर्शनामध्ये केएसबी लिमिटेडने कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक सादर केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या कृषी मेळ्यांपैकी एक असलेल्या या प्रदर्शनात शेतकरी व कृषी व्यवसायातील व्यावसायिकांना एकत्र आणून नवनवीन कृषी उपकरणे व तंत्रज्ञान सादर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
केएसबी लिमिटेड, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन आणि महावीर एंटरप्रायझेसचे मान्यवर डीलर श्री. सचिन चांगेडिया यांनी कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे उद्घाटन केले. तसेच श्री. जैन, केएसबी इंस्टॉलर श्री. घनश्याम भुमकर आणि श्री. अक्षय चव्हाण यांनी सौर पंप स्टॉलचे उद्घाटन केले. केएसबी लिमिटेडने प्रदर्शनात दोन स्वतंत्र स्टॉल्स उभारले असून, या स्टॉल्सला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे वैशिष्ट्येया स्टॉलमध्ये V6 पंपचे आडवे (horizontal) डेमो प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. याशिवाय, 6″ बोरवेल सबमर्सिबल पंपच्या यशस्वी आडव्या स्थापनेबाबत विद्यमान ग्राहकांनीही आपला अनुभव शेअर केला.या स्टॉलमध्ये सेल्फ-प्राइमिंग अक्वा सिरीज (0.5-1.5HP), ओपनवेल पंप (1PH & 3PH), 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप, LX+ आणि RLX सिरीज, ऑइल-फिल्ड 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप UMN सिरीज आणि मल्टिबूस्ट KHM / पेरिबूस्ट पंप्स – प्रेशर बूस्टर सिरीज यांसारखी विविध उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नियंत्रण पॅनल्स, स्टार्टर आणि फ्लॅट सबमर्सिबल केबल्स यांसारखी अॅक्सेसरीजही प्रदर्शनात आहेत.
याशिवाय, केएसबी बोरवेल पंप्समध्ये सर्वाधिक 4- आणि 5-स्टार रेटेड मॉडेल्स असून, ते उर्जाक्षम आहेत व ग्राहकांचे वीजबिल कमी करण्यात मदत करतात.
सौर पंप स्टॉलचे वैशिष्ट्येसौर पंप स्टॉलमध्ये 7.5HP पर्यंतची सौर सबमर्सिबल आणि सरफेस पंप्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध असून, ती MNRE मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारी आहे. 3HP सौर पंपसेट आणि सौर पंप कंट्रोलरचा थेट (लाइव्ह) डेमो देखील येथे पाहायला मिळत आहे.
आम्ही सर्वांना विनंती करतो की या दोन्ही स्टॉल्सना आवर्जून भेट द्या आणि कृषी, घरगुती व सौर पंप तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगती अनुभवावी. आमच्या टीमसोबत संवाद साधण्याची आणि केएसबी उत्पादनांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी गमावू नका.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वडगावशेरी मतदारसंघातील नदीलगतच्या घरांचे पुनर्वसन करा; आमदार बापूसाहेब पठारे

मुंबई: वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा, विश्रांतवाडी व कळस परिसरात दरवर्षी...

मुंबई बेंगलोर हायवे लगत परराज्यातील मुलींकडुन देहविक्रीचा व्यवसाय: महिला एजंट गजाआड

पुणे- मुंबई बेंगलोर हायवे लगत परराज्यातील मुलींकडुन देहविक्रीचा व्यवसाय...

भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन-भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई

'ज्या विधीमंडळाशी माझ्या वडिलांचं अतिशय प्रेमाचं नातं तिथे सन्मान…' मुंबई-...

पोलीस गृहनिर्माण महामंडळास विकसक नेमून पोलीस गृहनिर्माणास गती द्यावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळास विकसक म्हणून...