· महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकांना मॅग्मा एचडीआयच्या वैयक्तिकृत विमा उपाय सुविधांद्वारे आर्थिक सुरक्षा उंचावण्यासाठी भागीदारी
· नाविन्यपूर्ण जनरल इन्शुरन्स उत्पादने देखील पुरवण्यासाठी सहकार्य
मुंबई : भारताच्या जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनीने देशातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक असलेल्या महिंद्रा फायनान्ससोबत कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. या कराराअंतर्गत मॅग्मा एचडीआय महिंद्रा फायनान्सच्या ग्राहकांना मोटर आणि नॉन-मोटर विभागातील विविध जनरल इन्शुरन्स उत्पादने उपलब्ध करून देणार आहे.
या करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभात महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राउल रिबेलो आणि मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमारस्वामी यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राउल रिबेलो म्हणाले, “मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्ससोबतच्या सहकार्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना वैयक्तिकृत जनरल इन्शुरन्स कव्हरेज देऊ शकतो याचा आम्हाला आनंद आहे. उदयोन्मुख भारतासाठी जबाबदार आर्थिक उपाय सुविधा सहयोगी बनण्याची आपली बांधिलकी पूर्ण करताना हा धोरणात्मक सहयोग विमा क्षेत्राच्या सतत वाढणाऱ्या उपलब्धतेला चालना देईल.”
मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमारस्वामी म्हणाले, “महिंद्रा फायनान्ससोबतची आमची भागीदारी ‘2047 पर्यंत सर्वांसाठी विमा’ या विमा उद्योगाच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे. वैयक्तिकृत विमा उपाय उपलब्ध करून देऊन आम्ही आमच्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. त्याचवेळी जीवनातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी त्यांना आवश्यक ती मनशांती मिळेल हे आम्ही सुनिश्चित करतो.”
महिंद्रा फायनान्सची विस्तृत पोहोच आणि मॅग्मा एचडीआयच्या विमा क्षेत्रातील कौशल्याचा लाभ घेत, हे सहकार्य भारतभर ग्राहकांचा अनुभव आणि आर्थिक सुरक्षा वाढवण्यासाठी कार्य करणार आहे.