पुणे:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान ग्रुप च्या वतीने डॉ. आंबेडकरांचे विचार असलेली ५ हजार पुस्तके वाटून प्रसार करण्यात आला.
६८ व्या महापरिनिर्वाणदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे अशी संकल्पना संविधान ग्रुपने हाती घेतली. आज पाच हजार पुस्तके वाटून आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज व सुशिक्षित समाज घडवण्यासाठी पुढाकार घेतला. या वाटपावेळी संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल,संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वाती गायकवाड,महाराष्ट्र उपाध्यक्ष आरती केदारी, संविधान ग्रुपचे शहराध्यक्ष गणेश लांडगे,उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे,महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख प्रवीण सोनवणे असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.