पुणे-निवडणुकीच्या तोंडावर सरसकट १५०० रुपये दरमहा लाडक्या बहिणींना देणारे सरकार आता त्याच पद्धतीने म्हणजे ज्यांना पूर्वी दिलेत त्यांना न वगळता २१०० रुपये दरमहा देणार कि नाही ? यावरून आम्ही सरकारला धारेवर धरू असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे .
सरकारने लाडकी बहीण योजना काढली परंतु आता भाजप त्यामध्ये सर्शत अटी टाकण्याचा विचार करत आहे. सरकार २१०० रुपये महिलांना देणार की नाही, ज्या वंचित महिला योजनेपासून दूर राहिल्या त्यांना आगामी काळात समाविष्ट केले जाणार की नाही, याबाबत अधिवेशनात आम्ही मुद्दे मांडणार आहे. परंतु अधिवेशन कधी होणार, आम्हाला बोलण्याची संधी दिली जाणार का? हे प्रश्न आहे. सरकारला सहा महिने कामासाठी दिले पाहिजे. लोकांच्या खिशातून सरकार पैसे काढणार का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. बेरोजगारी, महागाई. भ्रष्टाचार याबाबत आगामी काळात आम्ही सरकारला जाब विचारत राहणार आहे.
रोहित पवार म्हणाले, महायुतीच्या नेत्यांना सर्व राज्यातील विविध ठिकाणी समान आसपास मते मिळाल्याचे ईव्हीएम मशीन मधून दिसून येते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे ईव्हीएम बाबत खुलासा करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नागरिकांच्या देखील ईव्हीएम बाबत शंका असून त्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी दूर केल्या पाहिजे. महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असून नऊ दिवसानंतर राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही किंवा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही, त्यामुळे लोकांनी मते देऊन चूक केली का? असे वाटू लागले आहे.
बसच्या दरात १४ टक्के वाढ करण्याच प्रस्ताव एसटी महामंडळाकडे आला आहे. व्यवसायिक गॅस १६ टक्के वाढ झाली असल्याने १७२ रुपयाने सदर गॅस महागलेला आहे. योजनादूत यांना दोन महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. महायुतीला ईव्हीएमने मदत केल्याने बाकी लोकांची काही मदत झाली नाही, असे त्यांना वाटत आहे. न्यायालयाच्या भरतीत देखील कंत्राटी भरती होणार आहे, याला आमचा विरोध असणार आहे.