देव दिवाळी व हेमंतभाऊ आमदार झाल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट तर्फे वैकुंठ स्मशानभूमीत साहित्य भेट – संदीप खर्डेकर.
पुणे-वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ असे सांगतानाच ” अधिकाऱ्यांनी येथे काय साहित्य व इतर सुधारणा करायच्या आहेत त्याची यादी त्वरित द्यावी ” अश्या सूचना नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी दिल्या.
आज देव दिवाळी च्या निमित्ताने आणि हेमंतभाऊ आमदार पदी निवडून आल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट च्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माजी नगरसेवक राजेश येनपुरे,ग्लोबल ग्रुप चे संजीव अरोरा, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे मनोज हिंगोरानी,मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर,उपअभियंता जयदीप अडसूळ,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त सतीश कोंढाळकर व विद्युतदाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते.
आमचे स्नेही मित्र हेमंत रासने यांचा पोटनिवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला होता असे संदीप खर्डेकर म्हणाले.
ही सल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य करून हेमंतभाऊंचे अभिनंदन करावे, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून आज देवदिवाळी च्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मी ही मदत कार्य करत असतो मात्र संदीप खर्डेकर हे गेली पस्तीस वर्षे (35 ) वैकुंठात सेवाकार्य करत असतात याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो अश्या शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फौंडेशन चा गौरव केला. तसेच मनपा च्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना ” रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य मी उपलब्ध करून देईन ” असे सांगतानाच, वैकुंठातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
भावी काळात शहरातील सर्वच स्मशानभूमीत जे जे साहित्य लागेल ते नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने देण्यात येईल असे मनोज हिंगोरानी व सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले.