पुणे, २८ नोव्हेंबर : जिल्हा परिषद वॉटर पोलो स्पर्धा नुकतीच संपन्न झाली . यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी पाण्यातून पदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. शेकडो खेळाडूंमध्ये शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळवून विजेतेपद पटकावले.
ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडूंचे यशाबद्दल अभिनंदन केले.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरण तलावात स्पर्धेला सुरूवात झाली. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलचा जलतरणपटू मंदार कोल्हटकर याने उत्कृष्ट कामगिरी करत विजयाचे पहिले खाते उघडले. डेक्कन मराठा ज्युनियर कॉलेज लांडेवाडी स्पर्धेत त्याने जोरदार डुबकी मारली आणि रौप्य पदक मिळवले. ध्रुव ग्लोबल स्कूल नांदेने पदक पटकावून आपली प्रतिभा चमकवली.
या स्पर्धेत इशान मंत्री, सोहम बारी, पारिजात चंद्र, जैत्रा भोर, आदर्श खोब्रागडे, पार्थ पोटे, सुमेध पानसे, मंदार कोल्हटकर, यश रेवतकर, विवान काळे, शर्विल जंगम, आयुष नशी आणि अद्विक भालेकर यांनी सहभाग घेतला. यांच्या थरारक खेळाने पदक जिंकून यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. आयोजित स्पर्धेत मुळशी तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. दरम्यान वॉटरपोलो प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूल संघांनी डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज लांडेवाडीचा ११-१ असा पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य संगीता राऊतजी, क्रीडा समन्वयक रोहित पाटील, क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय काठे यांच्या प्रमुख उपस्थित झाला.