पुणे : यंदाची ३८ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२४, पुढील रविवारी दिनांक १ डिसेंबर रोजी पहाटे सुरू होणार आहे. यात भाग घेणारऱ्या इंटरनॅशनल तसेच भारतीय धावपटुंसाठीआणि पुणेकर प्रेक्षकांसाठी ही मॅरेथॉन एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे वचन घेऊन येत आहे. या स्पर्धे मुळे पुण्यात निर्माण होणारे उत्साह पूर्ण वातावरण, पुण्याचा समृध्द सांस्कृतिक वारसा आणि पुणेकरांची खेळांची आवड याचे दर्शन होत असते.
यावर्षी या स्पर्धेचे ३८ वे वर्ष आहे. करोना सारखे एक दोन अपवाद वगळता , सन १९८३ पासून ही स्पर्धा सातत्याने पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट तर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (एम्स)समितीने त्यांच्या वार्षिक कॅलेंडर मध्ये आपल्या मॅरेथॉन चा कायम स्वरुपी समावेश केला असून भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असा “फ्लॅग शिप” चा मान हिला मिळाला आहे.
४२.१९५ किमी ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ब्राह्म मुहूर्तावर ३ वाजता सणस मैदानावरून सुरू होईल, त्यानंतर पहाटे ३.३० वाजता हाफ मॅरेथॉन २१.०९७५ किमी, सकाळी ६.३० वा. १० किमी
तसेच ७ वा. ५ किमी ची शर्यत ( सर्व रेसेस पुरुष आणि महिला गट) आणि सकाळी ७.१५ वा. ३ किमी ची व्हील चेअर अशा क्रमाने रेसेस सोडण्यात येतील.
दरवर्षी प्रमाणे च हजारो पुणेकर क्रीडा रसिकांनी सणस मैदान येथे एकत्र येणे अपेक्षित आहे.त्यामुळे सहभागी होणाऱ्या धावपटूंना आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल आणि ते त्यांची सर्वोत्तम
वेळ नोंदवतील. पुणेकर lखालील रेस मार्गावर उभे राहून त्यांना प्रोत्साहित करू शकतील.
स्पर्धा मार्ग : प्रारंभ सणस मैदानात आतील ट्रॅक वरून होईल ,सारसबाग मार्गे महालक्ष्मी चौक उजवी कडे वळून सरळ दांडेकर ब्रीज चौक मार्गे सिंहगड रस्ता, गणेश मळा, विट्ठलवाडी,आनंद हॉल, नांदेड सिटी चौक ,उजवी कडे वळून नांदेड सिटी मध्ये आत २ किमी जाऊन ( १०.५ किमी अंतर जन) परत याच मार्गे सणस मैदानावर एक फेरी पूर्ण करून दुसरी फेरी घेतील ( पूर्ण मॅरेथॉन साठी). इतर स्पर्धा याच मार्गावर आयोजित केल्या जातील ,त्यांचे टर्निंग पॉईंटस वेगळे असून तेथून धावपटू परत सणस मैदानात येऊन स्पर्धा समाप्त करतील.स्पर्धेत सहभगी होणाऱ्या खेळाडूंसाठी सुरक्षितता तसेच कोणताही त्रास होणार नाही, सहभागाचा आनंद मिळेल यासाठी संयोजन समिती तर्फे खालील सोयी, सुविधा करण्यात येत आहेत.
वैद्यकीय व्यवस्था समिती या समितीत १५० डॉक्टर्स आणि २५० नर्सिंग, फिजीओ स्टाफ , 108 नंबर च्या १० ॲम्ब्युलन्स , सणस मैदानात १५ बेडचे तात्पुरते हॉस्पिटल,याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर हे डॉक्टर्स , 108 ॲम्ब्युलन्स एम. इ.एम.एस. नर्सिंग स्टाफ खेळाडूंची काळजी घेतील. भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज,सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.
सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी,
एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ , १ ॲम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर , फिडींग बूथ ,एनर्जी ड्रिंक, फळे, ,स्पंजिंग (वॉटर बूथ )आणि इतर सर्व व्यवस्था ” वर्ल्ड ॲथलेटिक्स” आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघ ,नवी दिल्ली यांचे नियमां नुसार आणि अटिं नुसार करण्यात आली आहे.
एम्स आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे स्पर्धा मार्ग हा मान्यता प्राप्त आहे.
रनर ड्यूड्स, शिव स्पोर्ट्स, रनींग पंटर्स, पॉवरफुल अल्ट्रा रनर्स, बालेवाडी रनर्स, पीसीएमसी रनर्स, विश्व रनर्स, पी.आर.साऊथ ग्रुप,
नांदेड सिटी रनर्स ,अबकड रनर्स आदि पुण्यातील १२ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील. “आरोग्यम संस्था ” नवी मुंबई यांचे तर्फे त्यांचे खास धावपटूं साठी तयार केलेले एनर्जी ड्रिंक देण्यात येईल.
पुणे पोलिस दलातील तसेच ट्रॅफिक ब्रांच पुणे चे आधिकारी आणि
कॉन्स्टेबलस हे रात्री पासून ते स्पर्धा संपे पर्यंत वरील मार्गावर सुरक्षा, बंदोबस्तआणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे उत्तम रित्या करणार आहेत.
पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे ५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी ,जजेस व वेळाधिकारी , स्पर्धा नियमांनुसार तांत्रिक व्यवस्था पार पाडतील. त्यांची नेमणूक प्रारंभ व अंतिम रेषा, सर्व रेसेचे टर्निंग पॉईंटस वर , स्पर्धा मार्गावर निरीक्षण करणे आणि आंतिम निकाल बनविणे साठी केली जाईल.
या स्पर्धेसाठी संपूर्ण मार्गावर इलेक्ट्रॉनिक्स टायमिंग सिस्टीम बसवण्यात येईल. प्रत्येक धावपटूच्या स्पर्धा क्रमांकाच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स चीपशी ती जोडली जाईल आणि सर्व खेळाडूंना त्यांचे वैयकतिक टायमिंग दिले जाईल.
गेली तीन वर्षे सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत , ” सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस ॲड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंनामार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.
या स्पर्धेत सर्व गटात मिळून संपूर्ण देशातील ८ ते १० हजार खेळाडू सहभागी होतील. इथीओपिया,केनिया टांझानिया , नेपाळ इ. परदेशातील ७० दिग्गज पुरुष, महिला धावपटू सहभागी होतील.
त्यांना ज्योती गवते , मनीषा जोशी या महाराष्ट्राच्या आंतर राष्ट्रीय महिला धावपटू तसेच सेनादल,पोलिस दलातील धावपटू कडवी झुंज देतील.तसेच कारगिल (लडाख) मध्ये झालेल्या ” सरहद कारगिल
इंटर नॅशनल मॅरेथॉन २०२३ मधील विजेते तसेच जून २०२४ मध्ये द्रास येथे पार पडलेल्या ” सरहद शौर्याथॉन २०२४ चे विजेते महिला ,पुरुष धावपटू सुध्दा या स्पर्धेत सहभागी होत आहेत.३८ व्या पुणे आंरराष्ट्रीय मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूं ना बांबू सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बांबू पासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या “टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी” चे प्रतीक असेल आणि हेच या वर्षीचे ध्येय वाक्य आहे.पुणे आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन ने सातत्याने देशभरातील आणि परदेशी अव्वल धावपटुंना नेहमीच आकर्षित केले आहे.यंदाची स्पर्धा त्याला अपवाद राहणार नाही. स्पर्धेचा सपाट आणि वेगवान मार्गावर त्यांची
वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून आणि इतर आंतर राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांसाठी पात्र ठरण्याची एक आदर्श संधी देत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघ,नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.पुणे महानगर पालिके तर्फे विजेत्यांना दरवर्षी प्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येतील.