गोदरेज जर्सीच्या मिल्क रिपोर्टमधील माहिती
· उत्पादनांच्या यादीत 81% गायीचे तूप आणि 80% लोणी हे पदार्थ अव्वल
पुणे, 25 नोव्हेंबर, 2024: नॅशनल मिल्क डे च्या निमित्ताने सादर झालेल्या गोदरेज जर्सीच्या समग्र मिल्क रिपोर्टमधून पुणेकरांची पारंपरिक तसेच आधुनिक मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांविषयीची मजबूत आवड समोर आली आहे.
पारंपरिक दुग्धजन्य उत्पादने पुण्याच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवत असून, 81% पसंतीसह तूप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे, तर त्यापाठोपाठ 80% पसंती लोणी या दुग्धजन्य पदार्थाला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, पुणेकरांची पारंपरिक दुग्धजन्य उत्पादनांशी असलेली घट्ट नाळ कायम असून, पनीर आणि दही यांना 77% ग्राहक पसंती मिळाली आहे. आधुनिक दुग्धजन्य उत्पादनेही स्वीकारली जात आहेत. 52% ग्राहक आपल्या आहारात योगर्टचा समावेश करतात, तर 46% ग्राहकांना फ्लेवर्ड दूध आवडते.
‘बॉटम्स अप… इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!’ या नावाने प्रकाशित झालेल्या या सविस्तर अहवालात दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथील ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर आधारित माहिती दिली आहे. ग्राहकांच्या दुग्धजन्य उत्पादनांबाबतच्या आवडींसह, शेतातून थेट घरापर्यंत पोहोचणाऱ्या प्रीमियम दुधासाठीची गुणवत्तेची आवड आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी यांचाही अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला.
दुग्धजन्य उत्पादनांविषयीच्या या अनोख्या आवडीवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, “भारतीय ग्राहक पारंपरिक आवडींशी नाळ जोडून ठेवत आधुनिक दुग्धजन्य उत्पादनांबद्दलही खुलेपणाने विचार करतात. दही, पनीर आणि तूप यांसारख्या पारंपरिक आवडत्या उत्पादनांपासून योगर्ट आणि फ्लेवर्ड दूध यांसारख्या नव्या पर्यायांपर्यंत, आजचे दुग्धजन्य पदार्थांचे ग्राहक गुणवत्तेच्या आणि पोषणमूल्यांच्या बाबतीत जागरूक आहेत. भारताचे दुग्धजन्य पदार्थांचे उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती समजून घेऊन त्यांना योग्य उत्पादने देण्यास गोदरेज जर्सी कटिबद्ध आहे.”
भारतीय दुग्धजन्य उत्पादनांचे व्यापक चित्र पाहता गुणवत्तेवर स्पष्ट भर दिला जात असल्याचे दिसते. अहवालानुसार, अर्ध्याहून जास्त म्हणजे 54% भारतीय ग्राहक दुग्धजन्य उत्पादने खरेदी करताना गुणवत्तेला प्राधान्य देतात, तर पुण्यातील 64% ग्राहकांसाठी ही गुणवत्ता उच्च प्राधान्यक्रमावर आहे. दुग्धजन्य उत्पादनांत भेसळ नसावी याविषयीची जागरूकता वाढल्याने ग्राहक सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी जास्त किंमत देण्यास तयार असल्याचे दिसून येते.
या सर्वेक्षणाचे युगॉव्हने (YouGov) डिझाइन केले असून त्यांनीच ते राबविले आहे. गोदरेज जर्सी ब्रँडअंतर्गत उत्पादन विक्री करणाऱ्या गोदरेज ग्रुपच्या वैविध्यपूर्ण अन्न व कृषी व्यवसाय गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडची (GAVL) क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड ही उपकंपनी आहे.
गुणवत्ता आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देत गोदरेज जर्सी भारताच्या दुग्धजन्य पदार्थांच्या उद्योगाच्या विकासात योगदान देत आहे. कंपनीच्या एकात्मिक पशुपालन आणि शाश्वत शेतीविषयक उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील सर्वोत्तम पद्धतीचा अंगीकार करून उत्पन्न वाढवता येत आहे.