पुणे :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेतर्फे दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ साजरा होत आहे. दीप्ती भोगले,डॉ.राम साठ्ये यांच्यासह माया धर्माधिकारी,अंजली जाखडे,विनोद धोकटे आणि सौ.स्वाती विनोद धोकटे अशा एकूण ६ नाट्यकर्मींचा गौरव या कार्य्रक्रमात करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं ५ ते ७ या वेळात पं.जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता,पुणे येथे होणार असून या कार्यक्रमास परिषदेच्या सर्व सभासदांना व रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामुल्य राहील.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त परिषदेच्या वतीने पुण्यातील रंगकर्मींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हास(दादा) पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय चोरडिया तसेच नाट्यसिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.पुरस्कार वितरण सोहळ्यात पुण्यातील रंगकर्मी ‘लोकरंग २०२४’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखेचा कै.जयंतराव टिळक स्मृती गौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना देण्यात येणार आहे .कै.चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार डॉ.राम साठ्ये यांना देण्यात येणार आहे.माता जानकी जीवन गौरव पुरस्कार श्रीमती. माया धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे.लक्ष्मी -नारायण दांपत्य पुरस्कार विनोद धोकटे आणि सौ.स्वाती विनोद धोकटे यांना तर प्रपंचलक्ष्मी पुरस्कार अंजली जाखडे यांना देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्री स्व.मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ १० गरजू रंगकर्मींना अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्कार व पुरस्कारार्थी
१) कै.जयंतराव टिळक स्मृती गौरव पुरस्कार : मा. दीप्ती भोगले
२) माता जानकी जीवन गौरव पुरस्कार : श्रीमती. माया धर्माधिकारी
३) प्रपंचलक्ष्मी पुरस्कार : मा.अंजली जाखडे
४) लक्ष्मी – नारायण दांपत्य पुरस्कार : श्री.विनोद धोकटे आणि
सौ.स्वाती विनोद धोकटे
५) कै.चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार : डॉ.राम साठ्ये