पुणे : वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी व महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती आधारित असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉर्टीप्रोचे उपसंचालक डॉ. हर्षदीप सिंग, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, श्रद्धा रासने, विजय रासने तसेच महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, भाग्यश्री पाटील, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप, मोरेश्वर काळे, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, महानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते.
निबे म्हणाले की शेतीला पूरक असलेला फुलोत्पादन आणि बागायत हा व्यवसाय
शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून तो फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी आपला पारंपारिक व्यवसाय जपत फलोत्पादन आणि बागायत व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. भारत हा कृषिप्रधान देश असून ज्या देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या शहरांमध्ये देखील हॉर्टीप्रोची संस्कृती रुजत आहे. घरातील गॅलरीमध्ये, अंगणात, परस बागेत विविध वाणाची फळझाडे आणि फुलझाडे मोठ्या प्रमाणात लावली जात आहेत आणि याला मोठी मागणी आहे. म्हणून शेतकऱ्यांनी या व्यवसायाला जोड्या व्यवसाय म्हणून प्राधान्य द्यावे.
सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पहाण्यासाठी उपलब्ध आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले असून हॉर्टिकल्चर तज्ञांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
२२ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे सकाळी १० ते ७ पर्यंत सदरील प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.