२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता
पिंपरी, पुणे (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) मराठी सारस्वताचा अभिमान
पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध
नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे सुनील जाधव यांनी मानवी स्वभावातील कंगोरे अभिनयातून लिलया सादर केले.
‘मॅड सखाराम’ मध्ये श्रेयस वैद्य, विशाल मोरे, अलका परब, किरण राजपूत, प्राजक्ता पवार या सहकलाकारांनी आपापल्या भूमिका सादर केल्या. शिवाजी राणे यांची ध्वनी क्षेपण व्यवस्था केली.
यानंतर “अनुभूती” हा कार्यक्रम नुपूर नृत्यालयाने सादर केला. याची सुरुवात गुरु डॉ. सुमेधा गाडेकर यांनी गणेश वंदनेने केली. नंतर विद्यार्थिनींनी झपताल, कवित, आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारे द्रौपदी हा गतभाव इत्यादींची प्रस्तुती केली. त्यानंतर ‘महाराष्ट्राची संत परंपरा’ ही नृत्यनाटिका स्वरूपात प्रस्तुत केली. विविध संतांच्या कथा या नाट्य आणि नृत्य स्वरूपात प्रस्तुत केल्या. या नृत्य नाटिकेला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. सादरीकरणाचे निवेदन मंजिरी भाग्ये यांनी केले. नाटिकेत रसिका, मंजिरी, रिया, मुग्धा, अनुष्का, श्वेता, काव्या, आनंदी, नीरजा, अवनी, जान्हवी, अन्वी, त्रिषा, अन्विता, आर्या, अड्विका, दुर्गा, अर्पिता, अनुष्का, काव्या, कनीष्का, क्षेराजा या विद्यार्थिनींचा सहभाग होता.
स्वर सागरच्या अंतिम सत्रात “ब्लॅक अँड व्हाइट” या दृकश्राव्य हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचे निवेदन राहुल सोलापूरकर यांनी केले. मालविका दीक्षित, अभिलाषा चेल्लम, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर गायकांनी गाणी सादर केली, तर नृत्याविष्कार ऋतुजा इंगळेने सादर केला. “अपलम चपलम”, “मधुबन में राधिका नाचे रे”, “अपना दिल तो आवारा”, “अभी ना जाओ छोड़कर”, “प्यार किया तो डरना क्या” या सदाबहार गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली
स्वर सागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी थिगळे, हंबीर आवटे, श्रेयश आवटे, मृगेश नटराजन, गजानन शंकर चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, अनिल दराडे, सोनाली थोरवे, सुनील पोटे, शिरीष कुंभार, काजोल क्षीरसागर, राजू म्हेत्रे, संदीप बोडके, मलप्पा कस्तुरे, संतोष कुरळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.