सिस्टिमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम, ज्याला स्वीप म्हणून ओळखले जाते, हा भारतातील मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचा प्रमुख कार्यक्रम आहे. 2009 पासून निवडणूक आयोग भारतातील मतदारांना तयार करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मूलभूत ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी काम करत आहोत.
स्वीपचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व पात्र नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करून आणि निवडणुकीदरम्यान माहितीपूर्ण निर्णय घेऊन भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण करणे आहे. या कार्यक्रमात राज्याच्या सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्येच्या प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच मागील टप्प्यातील निवडणुकांमधील निवडणूक सहभागाचा इतिहास आणि त्यातून धडा घेण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक सामान्य आणि लक्ष्यित हस्तक्षेपांचा समावेश आहे.मतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टिसिपेशन’ (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे.
स्वीप’च्या माध्यमातून मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृतीसाठी मदत होणार आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा ‘स्वीप’चा मूळ उद्देश आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून केला जातो.
कसे असते ‘स्वीपचे कार्य
- मतदान जनजागृतीसाठी पोवाडा सादर करणे , या पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून निवडणुकीत मतदानाचे असलेले महत्त्व अधोरेखित करणे .
- विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती करणे तसेच पथनाट्य स्पर्धांसह प्रभातफेरी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे याचा सहभाग असतो
-स्वीप’च्या कामाचा आवाका पाहता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे हा उद्देश आहे . सर्व कार्यालयांनी विशेषतः शाळा, महाविद्यालयांनी यांचा सहभाग करून घेण्यासाठी पुढाकार घेणे आहे. मतदानावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. - मतदान जनजागृतीसाठी घोषणा तयार करणे , माहितीपर व्हिडीओ तयार करणे
दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार
मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छिणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी , भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अँपवर नोंदविणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होनार आहे.
दिव्यांग नागरिकांसाठी सुविधा
मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.
-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अँपवर आपले नाव कसे नोंदवावे लागणार आहे.
— नवी मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
— ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून द्यावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.
लेखक : प्रा योगेश अशोक हांडगेपाटील
(लेखक पुणे येथे कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)