जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे दिवाळीनिमित्त पंतप्रधान आणि सैनिकांप्रती कृतज्ञता
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील २ हजार विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांना पत्र लिहिली. दिवाळीनिमित्त ही पत्रे नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मिर येथे तैनात बीएसएफ जवानांना पाठवण्यात आली. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी पत्रातून जवानांना अभिवादन केले आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील सैनिकांबद्दल आदर या उपक्रमाद्वारे दिसून आला. भारतीय सेनेबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. भारतीय सैन्याविषयी आणि सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती यावेळी देण्यात आली.
तुम्ही सीमेवर आहात, म्हणून आम्ही देशात सुरक्षित आहोत. तुम्ही आमची ताकद आहात. आम्हाला ही मोठे झाल्यावर तुमच्यासारखे सैनिक व्हायचे असे लिहीत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आपला आदर व्यक्त केला.
पंतप्रधानांनी पुढाकाराने आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक लागू करण्यात आले आहे. ज्ञानाच्या बाबतीत भारताला एक मजबूत देश बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही मुलांनी पत्राद्वारे दिली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकास आणि नोकरी धिष्ठित शिक्षण असावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.